Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘युवकांच्या हाताला काम मिळणे हीच आजची सर्वात मोठी गरज’; देगाव येथील रोजगार मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन

देगाव येथे युथ फाउंडेशनतर्फे आयोजित रोजगार महामेळाव्यात ४००० हून अधिक तरुणांनी भाग घेतला. २,००० पेक्षा जास्त जणांना नोकरीची संधी मिळाली. खासदार उदयनराजे भोसले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. वाचा सविस्तर वृत्त.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 03, 2026 | 02:59 PM
‘युवकांच्या हाताला काम मिळणे हीच आजची सर्वात मोठी गरज’; देगाव येथील रोजगार मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन
Follow Us
Follow Us:

 

  • युवकांना रोजगार म्हणजे कुटुंबाच्या प्रगतीची नवी दिशा : खा. उदयनराजे भोसले
  • देगाव येथील रोजगार महामेळाव्यात चार हजारांहून अधिक युवकांचा सहभाग
  • दोन हजारांपेक्षा जास्त उमेदवारांची निवड
शाहूपुरी दि. ३ (प्रतिनिधी): “शिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांच्या हाताला काम मिळणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर केवळ एका व्यक्तीचे नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे जीवनमान उंचावते. त्यामुळे युवकांना नोकरी आणि करिअरच्या संधी उपलब्ध करून देणारे उपक्रम अधिकाधिक राबविले गेले पाहिजेत,” असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

देगाव येथे युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार महामेळाव्याला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार महेश शिंदे, भाजपा सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, युथ फाउंडेशनचे अध्यक्ष महेश सोनवणे, संग्राम बर्गे, कामेश कांबळे, हृदयनाथ पार्टे, फिरोज शेख, अमोल तांगडे, विनीत पाटील, राजेंद्र बर्गे-पाटील, रणजित माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सातारकरांनो, लक्ष द्या! जिल्ह्यात चित्रपटसृष्टी उभारण्याचे स्वप्न होणार पूर्ण! मेघराज राजे भोसले यांचे प्रयत्न

उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांना योग्य मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. रोजगार महामेळाव्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या आणि नोकरीच्या शोधात असलेले युवक एकाच व्यासपीठावर आले असून यामुळे रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे युवक आत्मनिर्भर बनण्यास मदत होते आणि त्यांच्या भविष्यास नवी दिशा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

या रोजगार महामेळाव्याला सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी आदी भागांतील चार हजारांहून अधिक सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी उपस्थिती लावली. विविध उद्योग, सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. विशेष म्हणजे दोन हजारांहून अधिक उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध झाली.

आमदार महेश शिंदे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, शिक्षित बेरोजगार युवकांसाठी हा महामेळावा आशादायी ठरला असून पश्चिम महाराष्ट्रातील रोजगार क्षेत्रासाठी तो महत्त्वाचा टप्पा आहे. रोजगाराच्या संधी युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून भविष्यातही अशा प्रयत्नांना पाठबळ दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Satara Politics : शपथपत्रातील माहितीवरून दोन नगरसेवक अडचणीत; अपात्रता प्रकरणाची सुनावणी 14 जुलैला

Web Title: Satara degaon mega job fair udayanraje bhosale youth foundation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Satara
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार
1

AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन
2

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे
3

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

Satara News : वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद; PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता, कर्मचाऱ्यांचा गौरव
4

Satara News : वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद; PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता, कर्मचाऱ्यांचा गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.