Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

साताऱ्यात विविध मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लोटांगण आंदोलन केले. पोलिसांशी शाब्दिक वाद झाल्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन संबंधित विभागांना कार्यवाहीचे निर्देश दिले.

  • By विवेक
Updated On: Jul 02, 2026 | 07:24 PM
दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

Follow Us
Follow Us:

सातारा | प्रतिनिधी : विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग बांधवांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अभूतपूर्व आंदोलन छेडले. आंदोलनकर्त्यांनी कार्यालयापासून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या मिटिंग हॉलपर्यंत लोटांगण घालत मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या वेळी पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वादही झाला.

दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अजय पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस होता. मुसळधार पावसातही आंदोलन सुरू ठेवत दिव्यांगांनी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली. अमोल निकम, प्रशांत बगले, शैलेंद्र बोर्डे, लतिका जगताप यांच्यासह अनेक दिव्यांग कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

दिव्यांगांना सरकारी नोकरीत संधी, एसटी बसच्या तिकीट रांगेत प्राधान्य, तसेच खेड येथील लतिका जगताप यांच्या घरकुल व शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी लोटांगण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

Post Office News: आता पोस्ट ऑफिस थेट आपल्या दारी! पुण्यात फोन आणि व्हॉट्सॲपवर सुरू झाली पार्सल पिक-अप सेवा

आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आणि नायब तहसीलदार कदम यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र “जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशीच चर्चा करणार” या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम राहिले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अखेर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत बहुतांश मागण्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला लवकरात लवकर लेखी आदेश देण्याची मागणी केली.

दरम्यान, लतिका जगताप यांच्या प्रकरणात प्रशासनाने सुरुवातीलाच ठोस भूमिका घेतली असती, तर आंदोलन इतके तीव्र झाले नसते, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी करत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

Web Title: Satara disabled protest roll to collector office demands pending

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती
2

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल
3

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना  आवाहन
4

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.