बिबट्याचे २ बछडे! वन विभागाने घडवली आईशी भेट
शहापूर व परिसरात यापूर्वीही रात्रीच्या वेळी शेतकरी आणि ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचे चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अशातच शहापूर परिसरात मशीनच्या साहाय्याने ऊसतोड सुरू असताना उसाच्या फडात बिबट्याचे दोन बछडे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बछडे आढळल्याबाबत ऊसतोड कामगारांनी तत्काळ स्थानिक नागरिकांना माहिती दिली. ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाचे अधिकारी चंद्रहार जगदाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही बछड्यांना सुरक्षित ताब्यात घेतले.
दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बछडे अवघे सात ते आठ दिवसांचे असून, त्यांना आईपासून कायमचे दूर करणे योग्य नसल्याने वन विभागाने काळजीपूर्वक नियोजन केले. बछड्यांना नैसर्गिकरीत्या मादीच्या स्वाधीन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. बछडे आढळलेल्या परिसरात कॅमेरे लावून बिबट्याच्या मादीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले. तसेच मादीला सुरक्षितपणे पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सलग दोन दिवस विशेष प्रयत्न केले. या मोहिमेला अखेर यश आले असून, बिबट्याच्या मादीला वन विभागाने पकडले. त्यानंतर मादी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
ही कारवाई सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक धैयशील पाटील व सहायक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मोहिमेत कोरेगाव वन परिक्षेत्राचे अधिकारी चंद्रहार जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार स्टेशनच्या वनपाल सुरेखा जगदाळे, वनरक्षक सुभाष बडदे, अजय कांबळे, सुनील शेलार, सागर बोडरे, प्रणव माकर आणि यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Purva Kaushik: आईच्या हातचा फराळ, मित्रांसोबतचा किल्ला अन् फटाक्यांची धमाल; ‘दीपज्योती’च्या ज्योतीने






