Dr Ambedkar School Entry Day
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या शाळेत प्रवेश घेतला होता. याच शाळेत त्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. पुढे त्यांनी मुंबईसह अमेरिका आणि लंडन येथे उच्च शिक्षण घेत विविध पदव्या संपादन केल्या. शिक्षणाच्या बळावर त्यांनी सामाजिक विषमता, जातिभेद आणि अन्यायाविरोधात लढा उभारला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री तसेच भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी देशाला जगातील आदर्श संविधान दिले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या की, बाबासाहेबांनी केवळ संविधानाची निर्मिती केली नाही, तर समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. समाजातील जातिभेदाची दरी दूर करून प्रत्येक नागरिकाला समान न्याय आणि शिक्षणाची संधी मिळावी, हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांची जडणघडण झालेल्या या ऐतिहासिक वास्तूमध्ये शाळा प्रवेश दिन साजरा होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
या वर्षाचे आणखी एक ऐतिहासिक महत्त्व म्हणजे राजवाड्याच्या द्विशताब्दी वर्षासह प्रतापसिंह हायस्कूलच्या अधिकृत मान्यतेला १७५ वर्षे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. अशा तीन ऐतिहासिक घटनांचा योग यंदा जुळून आला आहे.
प्रतापसिंह हायस्कूलने आपल्या २०६ वर्षांच्या ज्ञानदानाच्या परंपरेत अनेक नामवंत व्यक्तिमत्त्वे घडवली आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश गजेंद्रगडकर, ज्येष्ठ उद्योगपती तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू यांसारख्या मान्यवरांनी या शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक शाळेचा वारसा जपण्याबरोबरच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची, शैक्षणिक संघर्षाची आणि सामाजिक समतेच्या विचारांची ओळख करून देण्यात आली. बाबासाहेबांच्या शिक्षणप्रवासाची सुरुवात झालेल्या याच ऐतिहासिक वास्तूमध्ये शाळा प्रवेश दिन साजरा झाल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
Ans: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता.
Ans: ७ नोव्हेंबर २०२५ रोजी बाबासाहेबांच्या ऐतिहासिक शाळा प्रवेशाला १२५ वर्षे पूर्ण झाली.
Ans: बाबासाहेबांच्या शाळा प्रवेशाच्या १२५व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांच्या शैक्षणिक प्रवास, सामाजिक कार्य आणि समतेच्या विचारांना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.






