व्हॉट्सॲपचे नवे फिचर (फोटो सौजन्य - iStock_
मेसेज पाहिल्यानंतर, तो मजकूर आपोआप अदृश्य होईल. आतापर्यंत, हे फीचर फक्त फोटो, व्हिडिओ आणि व्हॉइस नोट्ससाठी उपलब्ध होते, पण आता कंपनी ते टेक्स्ट मेसेजसाठी देखील आणत आहे. हे फिचर अनेकांसाठी उपयुक्त ठरू शकतं.
WABetaInfo च्या ताज्या अहवालानुसार, हे नवीन व्हॉट्सॲप फीचर सध्या अँड्रॉइड बीटा वापरकर्त्यांसाठी आणण्यात आले आहे. हे व्हॉट्सॲप अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.26.45.6 मध्ये आढळले आहे. येत्या काही आठवड्यांत ते इतर बीटा वापरकर्त्यांसाठी आणि नंतर सर्वांसाठी उपलब्ध केले जाऊ शकते.
या फीचरमुळे, वापरकर्ते केवळ पासवर्डच नाही तर ओटीपी किंवा इतर संवेदनशील तपशील पाठवतानाही ‘एकदाच पहा’ (View Once) हा पर्याय निवडू शकतील. हे करण्यासाठी, प्रथम ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे, तिचा व्हॉट्सॲप चॅट उघडा. त्यानंतर, मजकूर टाइप करा आणि सेंड बटण क्षणभर दाबून ठेवा.
जर हे फीचर तुमच्या डिव्हाइसवर उपलब्ध असेल, तर तुम्हाला दोन पर्याय दिसतील: ‘Schedule Message’ आणि ‘View Once’. ‘View Once’ निवडा आणि ‘OK’ वर टॅप करा. त्यानंतर मेसेज पाठवता येईल.
अहवालांनुसार, प्राप्तकर्ता ‘View Once’ टेक्स्ट मेसेज कॉपी, सेव्ह, शेअर किंवा फॉरवर्ड करू शकणार नाही. स्क्रीनशॉट आणि ॲपमधील स्क्रीन रेकॉर्डिंगवरही बंदी असेल. मेसेज नेहमीच्या चॅट विंडोऐवजी एका वेगळ्या इंटरफेसमध्ये दिसेल. प्राप्तकर्त्याने मेसेज वाचल्यावर, ‘Opened’ स्टेटस दिसेल आणि तो मेसेज दोन्ही वापरकर्त्यांच्या चॅटमधून नाहीसा होईल.
Ans: 'View Once' हे Whatsapp चे नवे फिचर आहे
Ans: Android User साठी हे फिचर उपलब्ध आहे
Ans: मेसेज नेहमीच्या चॅट विंडोऐवजी एका वेगळ्या इंटरफेसमध्ये दिसेल






