Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींवर नगरपालिकेचे डेंजर झोन फलक

सातारा नगरपालिकेने गणेश विसर्जनाच्या मार्गावरील असणाऱ्या धोकादायक इमारती व अन्य शहरातील इमारतींवर डेंजर झोन म्हणून घोषित केले. तरी त्या-त्या इमारतीमध्ये राहणारे नागरिक अजून सजग झाले नसल्याचे दिसून येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 24, 2026 | 11:12 AM
साताऱ्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींवर नगरपालिकेचे डेंजर झोन फलक

साताऱ्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींवर नगरपालिकेचे डेंजर झोन फलक

Follow Us
Follow Us:

सातारा / श्रीरंग काटेकर : सातारा शहरातील विविध भागातील जुन्या व मोडकळीस आलेल्या असंख्य इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. याबाबत इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्क करण्यासाठी सातारा नगरपालिका प्रशासनाने अशा इमारतींवर डेंजर झोन म्हणून फलक लावलेले आहेत.

सातारा नगरपालिकेने याबाबत शहरात विविध भागात सर्वेक्षण करून धोकादायक स्वरूपात असलेल्या जागेच्या मालकांना नोटीसा पाठवून सतर्क यापूर्वीच केले आहे. धोकादायक इमारतीमध्ये राहणारे असंख्य नागरिक स्वतःचा जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत, अशा लोकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य ठिकाणी आपली सोय करणे गरजेचे आहे. सातारा नगरपालिकेने याबाबत ठोस भूमिका घेतली असून, याचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे. मोडकळीस व धोकादायक ठरू पाहत असलेल्या इमारतीमुळे आसपासच्या नागरिकांनाही धोका निर्माण झाला आहे.

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

काही वर्षांपूर्वी राजपथावरील जुनी इमारत डॉल्बी सिस्टीमच्या तीव्र आवाजामुळे पडून त्या ठिकाणी वडापाव चा व्यवसाय करणारे भोले मामा यांचा मृत्यू झाला होता. अशा दुर्दैवी घटना घडू नये म्हणून सातारा नगरपालिकेने जागेच्या मालकांना नोटीस देऊन सतर्क केले आहे.

भविष्यात मनुष्यहानीचा धोका निर्माण

सातारा नगरपालिकेने गणेश विसर्जनाच्या मार्गावरील असणाऱ्या धोकादायक इमारती व अन्य शहरातील इमारतींवर डेंजर झोन म्हणून घोषित केले. तरी त्या-त्या इमारतीमध्ये राहणारे नागरिक अजून सजग झाले नसल्याचे दिसून येत आहे. मोडकळीस व धोकादायक ठरू पाहत असलेल्या इमारतीमुळे भविष्यात मनुष्यहानीचा धोका निर्माण झाला आहे. इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनीही स्वतःच्या जीवाची काळजी घेणे गरजेचे आहे.

सातारा नगरपालिका प्रशासनाने मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारत जागेच्या मालकांना वेळोवेळी तोंडी व नोटीसा देऊन सतर्क केले आहे. परंतु, जागा मालक व भाडेकरू यांच्यामधील न्यायालय प्रक्रियेत असणाऱ्या वादामुळे इमारत पाडण्यासाठी विलंब होत आहे.

सातारा शहरात विविध भागात मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींमुळे शहराच्या विकासाला खीळ बसत आहे. अनेक मार्गावरील इमारतींमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. नागरिकांसाठीही अशा इमारती जीव घेणे ठरू शकतात. नगरपालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींवर लावलेले डेंजर झोन फलकाचा गांभीर्याने संबंधिताने विचार करणे आवश्यक आहे. नगरपालिका प्रशासनाच्या या कृतीचे स्वागत.

– श्रीरंग काटेकर, सातारा

Web Title: Satara municipality danger zone signs on dilapidated buildings in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • illegal construction
  • Satara Municipality
  • Satara News

संबंधित बातम्या

अबब! दारूबंदीच्या जावळीत उत्पादन शुल्क विभागानेच पकडली दारू; एकाच दिवशी आठ ठिकाणी कारवाई
1

अबब! दारूबंदीच्या जावळीत उत्पादन शुल्क विभागानेच पकडली दारू; एकाच दिवशी आठ ठिकाणी कारवाई

सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणाला आता वेग; 21 जागांसाठी 2019 मतदार, इच्छुकांची धावपळ
2

सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणाला आता वेग; 21 जागांसाठी 2019 मतदार, इच्छुकांची धावपळ

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
3

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

MNS : जामदा प्रकल्प क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात मनसे आक्रमक; मनसेच्या अविनाश सौंदळकरांकडून सखोल चौकशीची मागणी
4

MNS : जामदा प्रकल्प क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात मनसे आक्रमक; मनसेच्या अविनाश सौंदळकरांकडून सखोल चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.