Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : अस्वच्छता व सुविधांअभावी कलाकारांची नाराजी; दोन महिन्यांच्या नूतनीकरणासाठी नाट्यगृह राहणार बंद

Satara येथील शाहू कला मंदिरातील सुविधांच्या दुरवस्थेबाबत सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. नगराध्यक्ष Amol Mohite यांनी नाट्यगृहाची पाहणी करून दुरुस्तीच्या कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 19, 2026 | 09:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा शहरातील सांस्कृतिक उपक्रमांचे प्रमुख केंद्र असलेल्या शाहू कला मंदिरातील विविध सुविधांच्या दुरवस्थेबाबत सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या नाराजीनंतर सातारा पालिका प्रशासनाने तातडीने हालचाल सुरू केली आहे. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी शुक्रवारी शाहू कला मंदिराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि आवश्यक दुरुस्तीच्या कामांना गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
पाहणीदरम्यान शौचालयांची अस्वच्छ अवस्था, नादुरुस्त पडदे, मेकअप रूममधील अपुऱ्या सुविधा, वातानुकूलन यंत्रणेतील बिघाड तसेच इतर मूलभूत सुविधांमधील त्रुटी निदर्शनास आल्या. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाकडून तातडीने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच देखभाल आणि स्वच्छतेसंदर्भातील कामांच्या गुणवत्तेबाबत संबंधित ठेकेदारांकडूनही खुलासा मागविण्यात आला.

Pandharpur News : तांदूळवाडीच्या दुःखावर मदतीची फुंकर! दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना ४० लाखांची आर्थिक मदत

शाहू कला मंदिरातील आवश्यक दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामे प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी नाट्यगृह पुढील दोन महिने बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत नियोजित असलेले काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यप्रयोग पुढे ढकलावे लागणार आहेत.

रंगकर्मी आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी शाहू कला मंदिरातील समस्या दीर्घकाळापासून असल्याचे सांगितले असून, वेळोवेळी त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याने या विषयाची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

Satara News : पाणीपुरवठा बंदीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक! निर्णय न झाल्यास महामार्गावर तीव्र आंदोलनाचा इशारा

याबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सांगितले की, शाहू कला मंदिरातील सर्व आवश्यक सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नाट्यगृह अधिक सक्षम आणि सुविधायुक्त करण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुरुस्तीच्या कामांनंतर शाहू कला मंदिर अधिक आधुनिक, सुसज्ज आणि कलाकारांसाठी अनुकूल स्वरूपात उपलब्ध होईल, अशी अपेक्षा सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. मात्र, या कामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Satara news artists dissatisfied due to lack of cleanliness and amenities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

आरटीआय नियम २०२६ विरोधात साताऱ्यात माहिती अधिकार कार्यकर्ते आक्रमक; नियम रद्द करण्याची मागणी
1

आरटीआय नियम २०२६ विरोधात साताऱ्यात माहिती अधिकार कार्यकर्ते आक्रमक; नियम रद्द करण्याची मागणी

Satara News : पाणीपुरवठा बंदीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक! निर्णय न झाल्यास महामार्गावर तीव्र आंदोलनाचा इशारा
2

Satara News : पाणीपुरवठा बंदीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक! निर्णय न झाल्यास महामार्गावर तीव्र आंदोलनाचा इशारा

Satara Politics: ठाकरे गटाला साताऱ्यात खिंडार? २० ते २५ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
3

Satara Politics: ठाकरे गटाला साताऱ्यात खिंडार? २० ते २५ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

रिसोड बाजार समितीतील ११ कोटींच्या भूखंड वाटपावर प्रश्नचिन्ह; पणन संचालनालयाने मान्यता रद्द करत कारवाई
4

रिसोड बाजार समितीतील ११ कोटींच्या भूखंड वाटपावर प्रश्नचिन्ह; पणन संचालनालयाने मान्यता रद्द करत कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.