Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: ठाकरे गटाला साताऱ्यात खिंडार? २० ते २५ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

ठाकरे गटाला साताऱ्यात मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. युवासेना नेते अमेय घोले यांनी दावा केला आहे की, सातारा जिल्ह्यातील २० ते २५ माजी नगरसेवक सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या थेट संपर्कात आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 18, 2026 | 02:46 PM
ठाकरे गटाला साताऱ्यात खिंडार? २० ते २५ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर (Photo Credit - X)

ठाकरे गटाला साताऱ्यात खिंडार? २० ते २५ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे गटाला साताऱ्यात खिंडार?
  • २० ते २५ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
  • शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
सातारा: ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी आणि गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. खासदार आणि आमदारांनंतर आता ठाकरे गटातील नगरसेवकांमध्येही प्रचंड अस्वस्थता असून, आगामी काळात पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा खळबळजनक दावा युवासेना नेते अमेय घोले यांनी केला आहे. विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील ठाकरे गटाचे २० ते २५ नगरसेवक सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते लवकरच मोठा निर्णय घेतील, असे सांगत घोलेंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

‘मातोश्री’वरून वेळ मिळत नसल्याने लोकप्रतिनिधी नाराज

माध्यमांशी बोलताना अमेय घोले यांनी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “ठाकरे गटात सध्या लोकप्रतिनिधींची गळचेपी होत आहे. पक्षातील खासदार आणि आमदारांना नेतृत्वाकडून भेटण्यासाठी पुरेसा वेळ आणि महत्त्व दिले जात नाही. याच मुख्य कारणास्तव लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड नाराजी असून पक्षांतर्गत अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे.”

आम्हाला एकनाथ शिंदेंचेच नेतृत्व हवे!

“पक्षनेतृत्वाच्या अनास्थेला कंटाळून ठाकरे गटातील अनेक आमदार आणि खासदार आता उघडपणे ‘आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचेच नेतृत्व हवे आहे’, अशी भूमिका मांडत आहेत,” असा दावा घोले यांनी केला. यापूर्वी ज्याप्रमाणे काही प्रमुख खासदार आणि माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला, तीच पुनरावृत्ती आता उर्वरित नगरसेवकांच्या बाबतीतही पाहायला मिळणार असून ठाकरे गटाला आगामी काळात मोठ्या गळतीचा सामना करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्हीप म्हणजे नेमके काय? कधी लागू होतो आणि त्याचे उल्लंघन केल्यास काय होते? जाणून घ्या नियम

साताऱ्यातील २० ते २५ नगरसेवक संपर्कात

घोले यांनी या बंडाची सुरुवात कुठून होणार याचे संकेतही दिले. “सातारा जिल्ह्यातील सुमारे २० ते २५ नगरसेवक सध्या आमच्या थेट संपर्कात असून, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक आहेत. हे नगरसेवक लवकरच आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करतील,” असे सांगत त्यांनी साताऱ्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट केले.

संजय राऊतांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे!

ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना घोले म्हणाले की, “शिवसेना हा परंपरेने आणि विचाराने नेहमीच काँग्रेसविरोधी पक्ष राहिला आहे. मात्र, सध्याचा ठाकरे गट आपल्या मूळ विचारांपासून भरकटला असून तो थेट काँग्रेसला मदत करत आहे. ही तडजोड कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मान्य नाही. त्यामुळे संजय राऊतांनी रोज उठून दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा, पक्ष का रसातळाला जात आहे याचे आधी आत्मपरीक्षण करावे.” राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती पाहता ठाकरे गटातील नाराजी उफाळून आली असून, आगामी काळात अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असा विश्वास शेवटी अमेय घोले यांनी व्यक्त केला.

Operation Tiger: अरे देवा! मुंबई पालिकेत पण ऑपरेशन टायगर २.०? ३५ नगरसेवक संपर्कात; किरण लांडे यांचा दावा

Web Title: Thackeray faction faces split in satara 20 to 25 corporators in touch with eknath shinde claims amey ghole

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politcs
  • Satara News
  • Satara Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
1

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
2

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
3

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.