उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
उंब्रज येथील शासकीय विश्रामगृहाच्या तळमजल्यासाठी सुमारे २ कोटी २५ लाख रुपये, तर वरील मजल्यासाठी सुमारे ३ कोटी ५८ लाख रुपये, अशी एकूण सुमारे ५ कोटी ८३ लाख रुपयांची मंजुरी आहे. सुमारे ४५०० चौरस फुटांचा तळमजला आणि एकूण १० हजार चौरस फुटांचे बांधकाम असून, हे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पामध्ये निवास, बैठक, स्वागत, भोजन तसेच अन्य आवश्यक सुविधा प्रस्तावित आहेत.
Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी
कार्यक्रमात मसूर आणि पाळी येथील पुलांच्या प्रश्नाकडेही मंत्री भोसले यांनी लक्ष वेधले. या दोन्ही ठिकाणच्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रश्नांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कार्यक्रमातील आणखी एक लक्षवेधी मुद्दा म्हणजे विधान परिषद आमदार धैर्यशील कदम आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्याबाबत मंत्री भोसले यांनी केलेले भाष्य. दोघांमध्ये पूर्वी राजकीय मतभेद आणि स्पर्धा होती. मात्र, आता दोघेही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनाही राजकीय संधी दिली आहे, त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने कराड उत्तरचा विकास करावा, असा सल्ला मंत्री भोसले यांनी दिल्याचे कार्यक्रमस्थळी चर्चेत राहिले. दोघांमधील समन्वयाबाबत यापूर्वीही राजकीय पातळीवर चर्चा झाल्याचे वृत्त आले आहे.
Gauri Visarjan 2026: गौरी विसर्जनाआधी हे नक्की वाचा! ‘या’ 7 गोष्टींची विशेष काळजी घ्या
आपल्या मिश्कील शैलीत मंत्री भोसले यांनी “अजिंक्यतारा कारखान्याला ऊस घाला, थोडं आमच्याकडेही लक्ष द्या. मी भरभरून मदत करतोय, थोडी आम्हालाही मदत करा. आम्ही ऊस बिल द्यायला कधीही कमी पडणार नाही,” असे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्याला ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
मसूर जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे, शेवटच्या क्षणी बदललेली परिस्थिती आणि उंब्रज जिल्हा परिषद गटातील उमेदवारीचा पेच याबाबतही मंत्री भोसले यांनी आपल्या भाषणातून मतदारांची मानसिकता आणि निवडणुकीतील बदलती समीकरणे यावर सूचक भाष्य केले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्यांची चर्चा रंगली.
विशेष म्हणजे कराड उत्तरमध्ये यापूर्वी घोरपडे आणि कदम यांच्यातील राजकीय समन्वयाचा विषय चर्चेत राहिला असून, दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका यापूर्वीही सार्वजनिकरीत्या मांडली आहे.
विश्रामगृहाचे भूमिपूजन, पुलांच्या प्रश्नांवर तातडीच्या सूचना आणि त्यासोबत कराड उत्तरच्या राजकीय समीकरणांवर झालेली मिश्कील टोलेबाजी यामुळे उंब्रजचा हा कार्यक्रम विकासकामासोबतच राजकीय चर्चेचाही केंद्रबिंदू ठरला.






