Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : रस्त्यांची दुरवस्था आणि भरधाव वाहनांचा कहर; भीषण अपघाताने कराड हादरलं

कराडकरांसाठी बुधवार हा अक्षरशः घातवार ठरला. अवघ्या काही तासांच्या अंतरात शहर व परिसरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांचा थरार घडला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 27, 2026 | 02:27 PM
Satara News : रस्त्यांची दुरवस्था आणि भरधाव वाहनांचा कहर; भीषण अपघाताने कराड हादरलं
Follow Us
Close
Follow Us:
  • रस्त्यांची दुरवस्था आणि भरधाव वाहनांचा कहर;
  • भीषण अपघाताने कराड हादरलं
कराड : रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि त्यातच भराधाव वाहनांमुळे अपघाताच प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या घडीला दयनीय झालेले रस्ते मृत्यूचा सापळा ठरत आहेत. याची प्रचिती भीषण अपघाताने झाली. कराडकरांसाठी बुधवार हा अक्षरशः घातवार ठरला. अवघ्या काही तासांच्या अंतरात शहर व परिसरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये प्राध्यापिका, भाजी विक्रेती महिला आणि अ‍ॅपरिक्षा चालक अशा तिघांचा मृत्यू झाला. भरधाव वाहनांचा बेदरकार वेग, निष्काळजीपणा आणि रस्त्यांची दयनीय अवस्था यामुळे हे अपघात घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जनता बाजार परिसरात डंपरच्या धडकेत प्राध्यापिकेचा जागीच मृत्यू
शहरातील जनता बाजार परिसरात कराड-विटा मार्गावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात सुषमा आनंदा किर्तने (वय 54,. गजानन हौसिंग सोसायटी, कराड) यांचा जागीच मृत्यू झाला. त्या सैदापूर (विद्यानगर) येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका होत्या.

Kolhapur News : स्थानिक रोजगाराला मिळणार चालना; ‘पर्यटन सर्किटला’ केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

कराड शहरात नागरिकांमध्ये भीती संताप; उपाययोजनांची मागणी
एका दिवसात तीन अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याने कराड शहरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई, वाहतूक नियंत्रणाची कडक अंमलबजावणी आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

पोलिसांनी डंपरसह चालकाला घेतले ताब्यात तणावाचे वातावरण

महाविद्यालय सुटल्यानंतर त्या दुचाकीवरून बसस्थानकाच्या दिशेने जात असताना दगडांनी भरलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर डंपरने त्यांना काही अंतर फरफटत नेले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने डंपर घटनास्थळी सोडून पलायन केले. विशेष म्हणजे, पोलिसांनी डंपर ताब्यात घेतल्यानंतर तो पोलीस ठाण्यात नेताना वाटेत त्यातील दगड उत्तरविण्यात आल्याचे समोर आल्याने संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी डंपरसह चालकाला ताब्यात घेतले आहे.

Sangali News : “…अन्यथा आंदोलन करु”; उद्यानाच्या दुरावस्थेवर सांगलीकरांचा संताप

Web Title: Satara news poor condition of roads and havoc of speeding vehicles karad shaken by a terrible accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Karad news
  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

Ratnagiri : दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगी मात्र CNG तुटवड्याने व्यवसायावर गदा
1

Ratnagiri : दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगी मात्र CNG तुटवड्याने व्यवसायावर गदा

Vasai News : पशुसेवा करणारे हात फार कमी त्यासाठीच ॲनिमल ॲम्ब्युलन्स
2

Vasai News : पशुसेवा करणारे हात फार कमी त्यासाठीच ॲनिमल ॲम्ब्युलन्स

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक
3

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन
4

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.