Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara DCCB Election: शशिकांत शिंदेंच्या होमपीचवरच धक्का! आखाडे सोसायटीचा बँक ठराव अखेर राजे गटाच्या उषा शिंदेंच्या बाजूने

आखाडे हे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे होमपीच मानले जाते. त्यामुळे येथील ठराव हा शिंदे यांच्या बाजूनेच होणार अशी राजकीय चर्चा गेले काही दिवसांपासून रंगत होती. दोन्ही बाजूंनी संचालकांना सहलीवर देखील पाठवण्यात आले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 30, 2026 | 02:21 PM
Shashikant Shinde, Satara DCCB, Jawali Satara, Satara News

Shashikant Shinde, Satara DCCB, Jawali Satara, Satara News

Follow Us
Follow Us:

Satara DCCB Election: जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील विविध विकास सोसायट्यांच्या ठरावांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे होमपीच समजल्या जाणाऱ्या आखाडे गावातील विकास सोसायटीच्या ठरावाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिंदे गटाला आखाडे गावातून मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळेच शिल्पा शिंदे यांच्या विजयात आखाडे गावाची निर्णायक भूमिका राहिली होती.मात्र, सोसायटीच्या ठरावावेळी राजकीय समीकरणांना अनपेक्षित कलाटणी मिळाली. व येथील ठराव अखेर राजेगटाच्या बाजूनेच झाला.

Sanjay Raut on Amit Shah: राहुल गांधींच्या आरोपांनंतर गृहमंत्री गायब का? संजय राऊतांनी तोफ डागली

आखाडे हे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे होमपीच मानले जाते. त्यामुळे येथील ठराव हा शिंदे यांच्या बाजूनेच होणार अशी राजकीय चर्चा गेले काही दिवसांपासून रंगत होती. दोन्ही बाजूंनी संचालकांना सहलीवर देखील पाठवण्यात आले होते.आज गुरुवारी बँक ठरावासाठी सोसायटी संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती. त्या दृष्टीने दोन्ही बाजूंचे सहलीवर गेलेले संचालक बैठकीस हजर राहिले.

या बैठकीला दस्तुरखुद्द बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, जावळी पंचायत समिती सभापती सौरभ शिंदे, बाजार समिती सभापती जयदीप शिंदे हे देखील आखाडे गावात दाखल झाले होते. तर माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या बाजूने त्यांचे सुपुत्र तेजस शिंदे,माजी सभापती मोहनराव शिंदे, बाजार समिती संचालक बुवासाहेब पिसाळ यांच्यासह समर्थक आखाडे गावात दाखल झाले होते. दोन्ही बाजूंनी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

CJPला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर अमित शाहांचे अपयश…; अभिजीत दिपकेंचा घणाघात

दोन्ही गटांनी आपल्या संचालकांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठी रणनीती आखली होती.अशा परिस्थितीत संचालकांच्या झालेल्या बैठकीत राजेगटाच्या महिला संचालिका उषा सुरेशराव शिंदे यांना सहा मते, शिंदे गटाचे उमेदवार व सोसायटी चेअरमन राजेंद्र शिंदे यांना पाच मते मिळाली व हा ठराव राजे गटाच्या बाजूने झाला.

यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक फौजदार गंगावणे यांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता.

 

 

Web Title: Satara news satara dccb bank election akhade society resolution shashikant shinde raje group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Satara News
  • Satara Politics
  • Shashikant Shinde

संबंधित बातम्या

सातारा अन् पंढरपुरात माजी सैनिकांसाठी साकारणार अद्ययावत संकुल! महायुती सरकारचा मोठा निर्णय; शंभूराज देसाईंची घोषणा
1

सातारा अन् पंढरपुरात माजी सैनिकांसाठी साकारणार अद्ययावत संकुल! महायुती सरकारचा मोठा निर्णय; शंभूराज देसाईंची घोषणा

बेंदूर सणाच्या दिवशीच काळाचा घाला ! ‘सोन्या’ बैलाचा हृदयविकाराने मृत्यू
2

बेंदूर सणाच्या दिवशीच काळाचा घाला ! ‘सोन्या’ बैलाचा हृदयविकाराने मृत्यू

थोरल्या डोंगरावर श्रमदानाचा जागर! गावकऱ्यांनी मृत तळ्याला दिली नवसंजीवनी; भर उन्हाळ्यातील कष्टाला पावसाळ्यात आले यश
3

थोरल्या डोंगरावर श्रमदानाचा जागर! गावकऱ्यांनी मृत तळ्याला दिली नवसंजीवनी; भर उन्हाळ्यातील कष्टाला पावसाळ्यात आले यश

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत
4

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.