शिवाजी पार्कमध्ये सुगीच्या दिवाळी पहाटेला रसिकांची तुफान गर्दी (Photo - X)
मुंबई : दिवाळीची पहाट, सुरेल संगीत आणि त्याला सामाजिक बांधिलकीची जोड… असा सुंदर योग यंदा मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये पाहायला मिळाला. सुगी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट‘ कार्यक्रमाला तब्बल 10 हजारांहून अधिक रसिकांनी उपस्थिती लावत भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, या सांगीतिक सोहळ्यातून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि गरजू नागरिकांसाठी तब्बल 2 कोटी 15 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. (Mumbai News)
दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या सुरेल गायनाने वातावरण भारावून टाकलं. अभिनेता आणि सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे यांनीही आपल्या खास शैलीत कार्यक्रमात रंगत आणली. गायिका प्राजक्ता शुक्रे यांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. अभि मुंडे यांच्या काव्यसादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाली. अभिनेते स्वप्नील जोशी आणि मकरंद अनासपुरे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक कार्यासाठी जाहीर करण्यात आलेला मोठा निधी. सुगी ग्रुपने एकूण 2 कोटी 15 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Diwali : रुग्णालयाच्या आवारातही फुलवला दिवाळीचा आनंद; 400 जणांना फराळ, 75 महिलांना साड्या
या निधीचं वाटप पाच संस्थांना करण्यात येणार आहे.
एकीकडे संगीताचा आनंद आणि दुसरीकडे गरजूंसाठी मदतीचा हात, अशा दुहेरी उद्देशामुळे सुगीची यंदाची दिवाळी पहाट मुंबईकरांसाठी खास ठरली.






