Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: सातारा पालिकेच्या रोखल्या घंटागाड्या, सोनगाव ग्रामस्थ आक्रमक, धुराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची केली मागणी

साताऱ्यातील सोनगाव कचरा डेपोच्या धुरामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पालिकेच्या घंटागाड्या रोखून धरत ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास मज्जाव केला. नगराध्यक्षांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 23, 2026 | 05:46 PM
सातारा पालिकेच्या रोखल्या घंटागाड्या, सोनगाव ग्रामस्थ आक्रमक

सातारा पालिकेच्या रोखल्या घंटागाड्या, सोनगाव ग्रामस्थ आक्रमक

Follow Us
Follow Us:

 

  • सातारा पालिकेच्या रोखल्या घंटागाड्या
  • सोनगाव ग्रामस्थ आक्रमक
  • धुराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची केली मागणी
सातारा दिनांक २३ प्रतिनिधी: सोनगाव ग्रामस्थांनी पंधरा दिवस धुराचा त्रास सहन केल्यानंतर सोमवारी आक्रमक होत सोनगाव डेपोकडे जाणाऱ्या सातारा पालिकेच्या घंटागाड्या रोखल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी धुराचा पूर्ण बंदोबस्त होईपर्यंत डेपोकडे गाड्या न पाठवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला

आंदोलनाच्या दरम्यान नगराध्यक्ष अमोल मोहिते उपनगराध्यक्ष एडवोकेट दत्ता बनकर आरोग्य सभापती धनंजय जांभळे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी ग्रामस्थांची समजूत काढत धुराचा बंदोबस्त करण्याची ग्वाही दिली .सकाळी साडेआठ वाजता सोनगाव कचरा डेपो पासून शंभर मीटर अंतरावर ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिय्या मारून घंटागाड्या रोखत पत्रा संकलन बंद पाडले .धुराचा बंदोबस्त करा अन्यथा कचरा टाकू देणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेत घंटागाडी चालकांना इशारा दिला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सोनगाव शेंद्रे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

Swami Samarth Prakat Din: म्हसवड शहरात स्वामींचा प्रकटदिन उत्साहात साजरा, दर्शनासाठी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

आंदोलनाचे वृत्त कळताच नगराध्यक्ष अमोल मोहिते,उपनगराध्यक्ष एडवोकेट दत्ता बनकर,आरोग्य सभापती धनंजय जांभळे तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सोनगाव ग्रामस्थांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडत डेपोवर कचरा टाकण्यात येऊ नये अशी जोरदार मागणी केली. नगराध्यक्ष अमोल मोहिते व एडवोकेट दत्ता बनकर यांनी ग्रामस्थांची समजूत घातली. धुराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून त्याचा सोनगाव ग्रामस्थांना त्रास होणार नाही असे आश्वासन देण्यात आले. सोनगाव कचरा डेपोवर सीसीटीव्ही येथील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, कचरा डेपोतील दूषित पाणी गटाराद्वारे ओढ्यात सोडणे,धुराचा बंदोबस्त होईपर्यंत डेपोमध्ये कचरा टाकण्यात येऊ नये अशा मागण्या ग्रामस्थांनी केलेल्या आहेत. या सर्व प्रश्नांवर योग्य तो मार्ग काढला जाईल असे आश्वासन नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले आहे.

Web Title: Satara songaon kachra depot protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
1

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
2

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण
3

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
4

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.