Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara: तारळी धरणग्रस्तांचा सातार्‍यात एल्गार! प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चितकालीन ठिय्या आंदोलन सुरू

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली तारळी धरणग्रस्तांचे अनिश्चितकालीन ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. संकलन यादीतील त्रुटी आणि प्रलंबित पुनर्वसनाबाबत सविस्तर वृत्त वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 01, 2026 | 05:26 PM
तारळी धरणग्रस्तांचा सातार्‍यात एल्गार!

तारळी धरणग्रस्तांचा सातार्‍यात एल्गार!

Follow Us
Follow Us:

 

  • तारळी धरणग्रस्तांचा सातार्‍यात एल्गार!
  • प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चितकालीन ठिय्या आंदोलन सुरू
सातारा, दि. १ (प्रतिनिधी): तारळी धरण प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणग्रस्तांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चितकालीन ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात विविध गावांतील प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
धरण प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या बदल्यात मिळणाऱ्या हक्कांबाबत अनेक विसंगती असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

विशेषतः संकलन यादीतील त्रुटींमुळे अनेक पात्र लाभार्थींना पुनर्वसनाच्या प्रक्रियेतून वंचित राहावे लागल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अनेक वर्षे पाठपुरावा करूनही ठोस निर्णय झालेला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे धरणग्रस्तांचे म्हणणे आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाशी संबंधित अनेक बाबी अद्याप निकाली निघालेल्या नाहीत. पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच धरणाचा वापर सुरू करण्यात आल्याने प्रभावित कुटुंबांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने पुनर्वसनाशी संबंधित सर्व प्रकरणांची फेरतपासणी करून पात्र लाभार्थींना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

साताऱ्यात काँग्रेस आणि शरद पवार गटाचा सरकारविरोधी एल्गार, बैलगाडीतून आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सावरघर, भांबे, करंजोशी, डांगीस्टवाडी, निवडे आणि बोपोशी परिसरातील खातेदारांच्या नोंदींची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या करण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच पुनर्वसन प्रक्रियेत झालेल्या कथित त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या यंत्रणांची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली.

मागण्यांबाबत ठोस आश्वासन अथवा निर्णय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिवसभर विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. धरणग्रस्तांच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली.

Satara News : 2019 पासून जमिनीत भेगा, घरांना तडे; मोरेवाडीवर दरडसंकटाचे गडद सावट; ग्रामस्थांची आर्त हाक – ‘आमचं माळीण होऊ देऊ नका’

Web Title: Satara tarali dam project affected families protest collector office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
1

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
2

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
3

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
4

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.