Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: “प्रिया शिंदे यांची निवड कायदेशीरच, माध्यमांनी चर्चा थांबवावी”; आमदार महेश शिंदे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या निवडीवरून आमदार महेश शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 1812 सालापासूनचे कुणबी नोंदीचे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 09, 2026 | 07:07 PM
Satara News: “प्रिया शिंदे यांची निवड कायदेशीरच, माध्यमांनी चर्चा थांबवावी”; आमदार महेश शिंदे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
Follow Us
Follow Us:

 

  • “प्रिया शिंदे यांची निवड कायदेशीरच
  • माध्यमांनी चर्चा थांबवावी”
  • आमदार महेश शिंदे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
सातारा/प्रतिनिधी: जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या जात पडताळणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर माध्यमांमध्ये सुरू असलेली चर्चा थांबवावी, असे आवाहन कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केले. अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार झाली असून ती वैध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीनंतर महायुतीतील काही सहकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मात्र, या निवडी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडल्या असून अर्ज छाननीवेळी कोणताही आक्षेप नोंदवला गेला नव्हता. त्यामुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जात पडताळणीच्या मुद्द्यावर त्यांनी सांगितले की, प्रिया शिंदे यांच्या कुटुंबाची वंशावळ 1812 सालापासून उपलब्ध असून त्यामध्ये कुणबी समाजाच्या नोंदी आहेत. यापूर्वी अशा नोंदींवर अनेकांना ओबीसी दाखले देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणी माध्यमांमध्ये अनावश्यक चर्चा होऊ नये, असे त्यांनी नमूद केले. कोणालाही आक्षेप असल्यास त्यांनी तो संबंधित प्राधिकरणाकडे मांडावा, असेही त्यांनी सांगितले.

Satara News: वाईत मृत्यूचा सापळा ठरलेला रस्ता; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप उसळला

राजकीय पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीतील काही सदस्यांना महाविकास आघाडीशी युती मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी आमच्या बाजूने मतदान केले. कोरेगाव तालुक्यात ओबीसी उमेदवारांना संधी देताना कोणताही अन्याय झाला नसल्याचा दावा त्यांनी केला.

महायुतीतील समन्वयाबाबत त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगला समन्वय असून, काही किरकोळ मतभेद असूनही युती एकसंध आहे. “निवडणुकीदरम्यान काही मतभेद झाले असतील, मात्र ते आता मागे टाकून पुढे जाण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले. अडीच वर्षांनंतर सभापती पदासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना संधी दिली जाईल, असा विश्वासही महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

Satara Politics: काँग्रेसच्या सृजन अभियानाची साताऱ्यातून सुरुवात, हिमाचल प्रदेशचे आमदार मलिंदर राजन यांची प्रमुख उपस्थिती

Web Title: Satara zp president priya shinde caste verification mahesh shinde clarification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • Satara News
  • Satara ZP Election

संबंधित बातम्या

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत
1

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू
2

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान
3

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल
4

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.