Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सैदापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेला मान; सिंधुताई जाधव अध्यक्षपदी तर बशीर सय्यद उपाध्यक्षपदी

सरपंच फत्तेसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. नवनिर्वाचित अध्यक्ष सिंधुताई जाधव या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून, गेल्या चार वर्षांहून अधिक काळ सोसायटीच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 20, 2026 | 12:59 PM
सैदापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेला मान; सिंधुताई जाधव अध्यक्षपदी तर बशीर सय्यद उपाध्यक्षपदी

सैदापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेला मान; सिंधुताई जाधव अध्यक्षपदी तर बशीर सय्यद उपाध्यक्षपदी

Follow Us
Follow Us:
  • सैदापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच सिंधुताई जाधव यांची निवड.
  • बशीर सय्यद यांची उपाध्यक्षपदी निवड.
  • ग्रामीण महिला आणि वंचित घटकांना सहकार क्षेत्रात प्रतिनिधित्व.
ओगलेवाडी : सैदापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या इतिहासात प्रथमच महिलेला अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. सोसायटीच्या अध्यकपदी सिंधुताई जाधव, तर उपाध्यक्षपदी बशीर सय्यद यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे सैदापूरच्या सहकार क्षेत्रात नवा इतिहास घडला असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सरपंच फत्तेसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. नवनिर्वाचित अध्यक्ष सिंधुताई जाधव या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून, गेल्या चार वर्षांहून अधिक काळ सोसायटीच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण महिलांच्या नेतृत्वाला नवी संधी मिळाली आहे. तसेच उपाध्यक्ष बशीर सय्यद यांच्या निवडीमुळे कष्टकरी व वंचित घटकांनाही सहकार क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळाले आहे.

महिला नेतृत्वाचा सन्मान आणि सर्वसामान्यांना नेतृत्वाची संधी देणाऱ्या या निवडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी उपसरपंच अनिल जाधव, धनाजी जाधव, माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह शरद जाधव, रमेश जाधव, राजेंद्र जाधव, बाजीराव जाधव, तज्ञ संचालक सतीश जाधव यांच्यासह कर्मचारी, नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

सैदापूर सोसायटीच्या कामकाजाला नवी दिशा

उपाध्यक्षपदी बशीर सय्यद यांची निवड झाल्याने कष्टकरी आणि वंचित घटकांनाही सहकार क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळाले आहे. महिला नेतृत्व आणि विविध सामाजिक घटकांचा सहभाग यामुळे सैदापूर सोसायटीच्या कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे ग्रामस्थ आणि सभासदांनी अभिनंदन केले.

FAQ

प्रश्न १ : सैदापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?
उत्तर : सिंधुताई जाधव यांची अध्यक्षपदी निवड झाली.

प्रश्न २ : सोसायटीच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली?
उत्तर : बशीर सय्यद यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

प्रश्न ३ : सिंधुताई जाधव यांच्या निवडीचे वैशिष्ट्य काय आहे?
उत्तर : सैदापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या इतिहासात प्रथमच महिलेला अध्यक्षपद मिळाले आहे.

Web Title: Sindhutai jadhav appointed as chairperson of saidapur society nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : साताऱ्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी! शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; शाहू कला मंदिरासाठी ७२ कोटींचा निधी मंजूर
1

Satara News : साताऱ्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी! शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; शाहू कला मंदिरासाठी ७२ कोटींचा निधी मंजूर

Satara News : साताऱ्यात अतिक्रमणांचा प्रश्न चव्हाट्यावर; पालिकेने धडक मोहीम करत ३० अनधिकृत टपऱ्यांवर केली कारवाई
2

Satara News : साताऱ्यात अतिक्रमणांचा प्रश्न चव्हाट्यावर; पालिकेने धडक मोहीम करत ३० अनधिकृत टपऱ्यांवर केली कारवाई

‘महायुती म्हणून लढलो; अध्यक्ष-उपाध्यक्षही महायुतीचाच’; शंभूराज देसाईंच्या ‘जालीम उपाया’च्या वक्तव्याने राजकीय चर्चा
3

‘महायुती म्हणून लढलो; अध्यक्ष-उपाध्यक्षही महायुतीचाच’; शंभूराज देसाईंच्या ‘जालीम उपाया’च्या वक्तव्याने राजकीय चर्चा

सातारा जिल्हा बँकेत भाजपला सत्तेबाहेर ठेवत राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा ‘राजकीय वचपा’; भाजपच्या अंतर्गत गटबाजीचेही पितळ उघडे
4

सातारा जिल्हा बँकेत भाजपला सत्तेबाहेर ठेवत राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा ‘राजकीय वचपा’; भाजपच्या अंतर्गत गटबाजीचेही पितळ उघडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.