Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: सत्ता परिवर्तनाची चळवळ तळागाळात राबवली पाहिजे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा साताऱ्यात पवित्रा

साताऱ्यात ओबीसी जिल्हा संघटनेच्या वतीने ओबीसी बहुजन संविधान बचाव अभियान येथील शाहू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित केले होते त्यावेळी लक्ष्मण हाके बोलत होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 30, 2026 | 09:13 PM
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा साताऱ्यात पवित्रा

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा साताऱ्यात पवित्रा

Follow Us
Follow Us:

 

  • सत्ता परिवर्तनाची चळवळ तळागाळात राबवली पाहिजे
  • ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा साताऱ्यात पवित्रा
सातारा दि ३० (प्रतिनिधी): 2019 च्या आगामी निवडणुकांमध्ये इतर मागास प्रवर्गाच्या मतदारांनी सत्तेतला आपला हिस्सा आता हिसकावून घ्यायला हवा सत्ता परिवर्तनाची चळवळ ही आता व्यापक पद्धतीने तळागाळातून राबवणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे असे कळकळीचे आवाहन ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केले .

साताऱ्यात ओबीसी जिल्हा संघटनेच्या वतीने ओबीसी बहुजन संविधान बचाव अभियान येथील शाहू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित केले होते त्यावेळी लक्ष्मण हाके बोलत होते. यावेळी ॲड मंगेश ससाणे, नवनाथ वाघमारे, चंद्रकांत खंडाईत, भरत लोकरे उपस्थित होते.

हाके पुढे म्हणाले, ‘‘ओबीसी समाज आजही हक्कांसाठी झोळी घेऊन उभा आहे, ही शोकांतिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ओबीसींपर्यंत पोहोचले नाहीत, त्यामुळे अन्याय सहन करण्याची वेळ आली आहे. राजसत्ता ही मागून मिळत नाही, ती हिसकावून घेण्याची हिंमत मनगटात असावी लागते. आजपर्यंत निर्णय प्रक्रियेत ओबीसींचा सहभाग नसल्याने अध्यक्षपद, वसतीगृह यांसारख्या सुविधा मिळत नाहीत.

Baramati By Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही; ‘या’ नेत्याने केला तीव्र विरोध

ओबीसी चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज असून वास्तवतेची धुरा कुणीतरी स्वीकारली पाहिजे. त्यामुळे २०२९ पर्यंत ही चळवळ दिल्लीपर्यंत पोहोचवून सत्तेचा बदल घडवून आणू. ओबीसीतील भटक्या-विमुक्त समाज आजही मूलभूत गरजांपासून वंचित आहे. त्यांच्याकडे जमीन नाही, शिक्षणाची सोय नाही, मग आपण नेमक्या कोणत्या भारतात जगतो आहोत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

फुले-शाहू-आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्र आता दिसत नाही, तर तो काही मोजक्या कारखानदारांच्या हातात गेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मंडल आयोगाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुढे यावे लागेल. आम्ही संविधान आणि कायद्याची भाषा बोलत असल्यामुळेच आमच्यावर विरोध होत असल्याचेही त्यांनी सांगितले.’’

‘अजित पवार यांच्या नावाला विरोध नाही, पण…’; अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या नावावरून हाके आक्रमक

Web Title: Satta parivartan movement should be implemented at grassroots obc leader laxman hake satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • Laxman hake
  • political news
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
2

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती
3

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल
4

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.