Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vikhroli News: ड्रग्ज नको, मैदानी खेळांना प्राध्यान्य! विक्रोळीत ड्रग्जविरोधी जनजागृतीसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मुंबईतील विक्रोळी टागोर नगर येथे "ड्रग्जला नाही, क्रीडेला होकार" असा संदेश देत भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खासदार संजय दिना पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 25, 2026 | 08:49 PM
Vikhroli News: ड्रग्ज नको, मैदानी खेळांना प्राध्यान्य! विक्रोळीत ड्रग्जविरोधी जनजागृतीसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुंबईत ड्रग्जविरोधात क्रिकेटचा एल्गार!
  • विक्रोळीत भव्य सामन्यांचे आयोजन
  • खासदार संजय दिना पाटील आणि जितेंद्र आव्हाडांची उपस्थिती
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क/नीता परब: वाढत्या ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुण पिढीला योग्य दिशा मिळावी, युवकांनी व्यसनापासून दूर राहून क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे तसेच समाजात ड्रग्जविरोधी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने स्व. दिना बामा प्रतिष्ठान व सैयद अझरुद्दीन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रोळी, टागोर नगर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी, स्थानिक नागरिक व युवकांनी उपस्थित राहत  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ड्रग्ज नको, मैदानी खेळांना प्राध्यान्य

या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना “ड्रग्जला नाही, क्रीडेला होकार” असा सामाजिक संदेश देण्यात आला. आजच्या घडीला ड्रग्जचे वाढते प्रमाण हे समाजासमोर गंभीर आव्हान बनले असून अनेक तरुण चुकीच्या मार्गाला अवलंबत आहेत. व्यसनाधीनतेमुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असून समाज व देशाच्या भवितव्यावरही त्याचा परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर युवकांना व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा मिळावी व त्यांच्यात क्रीडा संस्कृती वाढीस लागावी यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यांना ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील, कळवा-मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

Mumbai News: टीबीमुक्त मुंबईची उद्यापासून व्यापक मोहीम! राज्यपाल जिष्णू वर्मा यांची संकल्पना; धारावी, सायनमधून शुभारंभ

युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हावे

यावेळी खासदार संजय दिना पाटील यांनी युवकांशी संवाद साधताना ड्रग्जविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज अधोरेखित केली. युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ईशान्य मुंबई परिसरात वाढत्या ड्रग्जच्या समस्येविरोधात खासदार संजय दिना पाटील यांनी यापूर्वीही वेळोवेळी आवाज उठविला आहे. विविध बैठका, पोलीस प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चांमध्ये त्यांनी ड्रग्जविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिसरात सुरू असलेल्या अवैध ड्रग्ज व्यवहारांवर अंकुश आणण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, युवकांमध्ये जनजागृती करावी तसेच शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अधिक दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे केली आहे. समाजातील युवक सुरक्षित राहावेत व व्यसनमुक्त वातावरण निर्माण व्हावे यासाठी खासदार पाटील सातत्याने पाठपुरावा करत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

युवकांना क्रिकेटसारख्या खेळांमध्ये मोठे व्यासपीठ उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न

ईशान्य मुंबईतील युवकांना क्रिकेटसारख्या खेळांमध्ये मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. अनेक गुणवंत खेळाडूंना आर्थिक अडचणींमुळे पुढे जाता येत नाही, त्यामुळे अशा स्पर्धांमधून त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. क्रीडा क्षेत्रामुळे युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धेदरम्यान खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. अंतिम सामन्यांवेळी प्रेक्षकांनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. स्थानिक युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत ड्रग्जविरोधी जनजागृतीसाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

Mumbai News: हार्बर एसी लोकलला ‘सुपरफास्ट’ प्रतिसाद! १५ दिवसांत ६५ टक्क्यांची प्रवासीवाढ; महसूलही दुपटीकडे

Web Title: Say no to drugs prioritize outdoor sports cricket tournament organized in vikhroli to raise awareness against drugs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 08:36 PM

Topics:  

  • Drugs Case
  • Sanjay Dina Patil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.