
नवी मुंबईतील टेम्पोची अवस्था (फोटो सौजन्य - iStock)
वाहतूक उपायुक्त काय पावले उचलणार?
नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्याकडून या वाढत्या नियमभंगावर कठोर धोरण लागू होणार की नाही? याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. काही दिवसांपासून विविध विभागांत ओव्हरलोड वाहनांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांनी याबाबत थेट तक्रारी करण्यासही सुरुवात केली आहे.
खारघर कोस्टल रोड सुरू होण्यासाठी विलंब; वन विभागाच्या परवानग्यांचा अडथळा, २०२९ मध्ये पूर्ण होणार
अपघातानंतर वाहतूक विभागाचे डोळे उघडणार का?
या बेकायदेशीर अवजड वाहनांमुळे एखादा अपघात झाल्यावरच वाहतूक विभागाचे डोळे उपडणार का? असा रोष देखील नागरिक व्यक्त करत आहेत, कधी कधी तर या बेकायदेशीर वाहन चालकांच्या मनमानीचा त्रास स्थानिक व वाहन चालकांनादेखील सहन करावा लागत असल्याने, यायावत संताप व्यक्त केला जात आहे. अनेकदा ही वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक करतात. अशा या ओव्हरलोड वाहनांमुळे अपघाताची भीती वाढली आहे. यामध्ये भंगार वाहून
नेणाऱ्या या वाहनांमध्येतर वजन क्षमतेपेक्षा तसेच आकारमान मर्यादेपेक्षाही दुप्पट तिपटीने माल वाहून नेला जातो. अश्यातच या वाहनातून बाहेर लोंबकळणारे लोखंडी रॉड, स्कैंप बेकायदेशीरपणे बांधलेल्या प्लास्टिक गोण्यांचा समावेश असलयाने बाहेर लोंबकळणाऱ्या लोखंडी रॉडला ठेवायचे दर्शनी चिन्ह म्हणजेच लाल कपड़ा अथवा लाल लाईटदेखील लावली जात नाही. यामुळे अपघात होऊन एखादा अनर्थ घडण्याची शक्यता जास्त असते.
पोलिसांनाच ‘आशीर्वाद’ देताहेत का भंगार माफिया ?
तसेच या वाहन चालकांकडे योग्य परवाने नसल्याचीही माहिती समोर येत आहे. तर काही बाहचालक हे मद्यपान अथवा नशा करून देखील वाहन चालवतात. यामुळे छोट्या वाहनांवर, दुचाकींवर आणि पादचाऱ्यांवर अपघाताचा धोका वाढतो, पण तरीही कारवाई दिसत नाही. एका स्थानिक चालकाने सांगितले, “आमच्यासारख्या दुचाकी किवा रिक्षाचालकांवर ताबडतोब दंड होतो. पण या ओव्हरलोड टेम्पोंना कोणीही अडवत नाही. हे वाहनं कोणाच्या आशिर्वादाने चालतात?” मागील काही काळात याचा अनधिकृत भंगार माफियाचे भंगार गोळा करण्यावरून दोन गटांत भर दिवसा आणि भर रस्त्यात तुंबळ हाणामारी झाली होती. यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
इलेक्ट्रीक वाहनांसाठी पहिल्या टप्यात सुरू होणार ८ चार्जिंग स्टेशन, नवी मुंबईत मिळणार जागा
गोडाऊनमध्ये काय चाललंय याची पोलिसांना खबर नाही?