नवी मुंबई पोलिसांचा अॅक्शन मोड ऑन ! खारघर मधील बॅक फॉरेस्ट हुक्का पार्लरवर कारवाई करत 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त
सावन वैश्य / नवी मुंबई: महाराष्ट्र विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत असताना, दुसरीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये हुक्का पार्लर्सची वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. हे पार्लर्स तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढवत असून, काही ठिकाणी लपूनछपून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचेही उघडकीस आले आहे. यामुळे अनेक तरुण वाईट सवयींकडे वळत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता सरकारने कडक भूमिका घेतली असून, अशा हुक्का पार्लर्सवर धाडी टाकून कारवाई केली जात आहे. पोलिस आणि प्रशासन यांच्या संयुक्त मोहिमांमुळे काही प्रमाणात अंमली पदार्थांच्या साखळीवर आळा बसतो आहे. मात्र, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हुक्का पार्लरवर कारवाईबाबत पोलिसांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे नवी मुंबईतील जवळपास सर्वच हुक्का पार्लर पोलिसांनी कारवाई करत बंद केले आहेत. मात्र लपून-छपून सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर देखील पोलीस शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करत आहेत. खारघर पोलिसांनी अशाच एका ब्लॅक फॉरेस्ट कॅफे या हुक्का पार्लरवर कारवाई करून, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
Jitendra Awhad : ‘या’ मोबाईल नंबरवरून जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी
नशा मुक्त नवी मुंबई या अभियानांतर्गत पोलिसांनी अमली पदार्थ तसेच नशिली पदार्थ सेवन व विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा फास आवळल्याच दिसून येत आहे. खारघर पोलिसांनी सेक्टर 10 मधील ब्लॅक फॉरेस्ट कॅफे या हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. या कारवाईत खारघर पोलिसांनी हुक्का पार्लरमधील त्याला लागणारे फ्लेवर्स, हुक्का पोट, टेबल, खुर्ची, सोफा तसेच इतर साहित्य असा एकूण 1 लाख 55 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये रोहित राजपूत, वय 24 वर्ष, राहणार नेरूळ, बुटासिंग जसपाल सिंग, वय 24 वर्ष, राहणार कळंबोली, अंकित पवन सिंग, वय 27 वर्ष, राहणार कळंबोली, अजय गौतम कुमार, वय 20 वर्षे, राहणार खारघर, अमित सुधीर सिंग, वय 29 वर्ष, राहणार कळंबोली, कमल जगदीश शहा, वय 23 वर्ष, राहणार कळंबोली, या 6 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.