Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी १४४ कलम लागू, मध्यरात्री पाडण्यात येणार पूल

चांदणी चौकातील पूल स्पोटकांद्वारे पाडण्यात येणार आहे. या कामाच्यावेळी तसेच तेथील राडारोडा उचलण्याची कार्यवाही होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच पूल (Bridge) पाडण्यासाठी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चांदणी चौक परिसरात सायंकाळी कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 01, 2022 | 08:42 PM
चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी १४४ कलम लागू, मध्यरात्री पाडण्यात येणार पूल
Follow Us
Follow Us:

पुणे- मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सदर पूल एक व दोन ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. हा पूल पाडण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सदर पूल पाडण्यासाठी दुपारी ४ वाजल्यापासून १४४ कलम लागू करण्यात येणार आहे, अशी महत्वाची माहिती पुणे (Pune) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

चांदणी चौकातील पूल स्पोटकांद्वारे पाडण्यात येणार आहे. या कामाच्यावेळी तसेच तेथील राडारोडा उचलण्याची कार्यवाही होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच पूल (Bridge) पाडण्यासाठी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चांदणी चौक परिसरात सायंकाळी कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. तसेच ११ वाजण्याच्या आधी सर्व परिसर निर्मनुष्य करण्यात येणार आहे.

सर्व बाबी व्यवस्थित असेल तर पूल आधीच स्फोटकाद्वारे पाडण्यात येईल. रात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास पूल पाडला जाईल. सकाळी लवकरात लवकर रस्ता सुरू होण्याचे पूर्ण प्रयत्न केले जातील, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

‘चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी दोन्ही रस्त्याची वाहतूक रात्री ८ नंतर थांबवण्याचे काम सुरू होईल. सांयकाळी ६ वाजल्यानंतर परिसर निर्मनुष्य करायला सुरुवात होईल. लवकरात लवकर हा पूल पाडून नागरिकांना गैरसोय होणार नाही हा प्रयत्न आहे. सकाळी ८ वाजता वाहतूक सुरू होईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती देखील डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

वाहतुकीतील बदल

मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात येणार आहे. साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे. मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतूकीस बंदी करण्यात येणार आहे. मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजून सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीस बंदी राहील.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरीता

मुंबईकडून येणारी हलकी व प्रवासी चारचाकी वाहने ऊर्से टोलनाका येथून जुन्या पुणे- मुंबई रस्त्याने भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनीअरींग कॉलेज चौक, संचेती चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.

वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन विद्यापीठ चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.

राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडने विद्यापीठ चौक, उजवीकडे वळून संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.

साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरीता

खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक, डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रोडने वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.

खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल अंडरपास, सिंहगड रोडने राजाराम पूल, डी.पी. रोडमार्गे नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.

खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल, वारजे पूल अंडरपास, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक, नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.

Web Title: Section 144 will be applied to demolish the bridge in the square the bridge will be demolished at midnight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2022 | 06:20 PM

Topics:  

  • Marathi News
  • Section 144

संबंधित बातम्या

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस
1

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस

CJP protest: CJP आंदोलन अन् थेट UN ची एंट्री! भारताने संयुक्त राष्ट्रसंघाला कसं खडसावलं?
2

CJP protest: CJP आंदोलन अन् थेट UN ची एंट्री! भारताने संयुक्त राष्ट्रसंघाला कसं खडसावलं?

Megha Dhade Daughter New Movie: मेघा धाडेच्या लेकीची मनोरंजनविश्वात एन्ट्री! थेट गणेश आचार्य यांच्या बायोपिकमध्ये मिळाली संधी
3

Megha Dhade Daughter New Movie: मेघा धाडेच्या लेकीची मनोरंजनविश्वात एन्ट्री! थेट गणेश आचार्य यांच्या बायोपिकमध्ये मिळाली संधी

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट
4

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.