
Megha Dhade Daughter New Movie: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मेघा धाडेची लेक साक्षी पावस्कर आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तिचा पहिला सिनेमा आहे ‘गणेश डस्ट टू स्टारडस्ट’. हा सिनेमा प्रसिद्ध डान्स डायरेक्टर गणेश आचार्य यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांच्या करिअरची सुरुवात कशी झाली हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला त्याट्रेलरमध्ये साक्षीची झलक पाहून सगळेच खुश झाले आहेत. जरी छोटा रोल असला तरी तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Nana Patekar: रात्री २.३० वाजता नाना पाटेकरांनी मित्राला केला मेसेज; कोण हा मित्र?
लेकीच्या पहिल्या सिनेमासाठी मेघा खूपच भावुक झाली. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकत लिहिले आहे की, “लाडक्या लेकीचं रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल पडतंय, आशीर्वाद असू द्या…. आई अंबाबाईच्या नावानं चांगभलं…”तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट करून साक्षीला शुभेच्छा दिल्या आहेत. सगळेजण तिचे अभिनंदन करत आहेत.
‘गणेश डस्ट टू स्टारडस्ट’ हा सिनेमा V2S Production & Entertainment ने बनवला आहे. याची निर्माती सौंदर्या आहेत आणि दिग्दर्शन स्वतः गणेश आचार्य यांनीच केले आहे. कथा आणि डायलॉग पण गणेश आचार्य आणि दिगंगना सूर्यवंशी यांनी लिहिले आहेत.हा सिनेमा 11 डिसेंबरला थिएटरमध्ये येणार आहे. यात साक्षी पावस्कर बरोबर शिवांशु सोनी, आलोक शॉ, सुकन्या काळण हे कलाकार पण महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
गणेश आचार्य यांनी बॉलिवूडमध्ये खूप मोठे नाव कमावले आहे, त्यांच्या आयुष्यावरचा हा सिनेमा त्यांच्यासाठी पण खूप स्पेशल आहे. आणि याच सिनेमातून मेघा धाडेच्या लेकीने सुरुवात करणे ही तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.आता साक्षी मोठ्या पडद्यावर काय कमाल करते हे बघायला सगळे उत्सुक आहेत. आईसारखीच ती पण प्रेक्षकांची मने जिंकेल अशी आशा आहे.