Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रावेत–बाणेर मार्गावर भीषण कोंडी; अरुंद पूल, अतिक्रमण आणि रखडलेले प्रकल्प ठरतायत मुख्य कारण

वाकड परिसराजवळील भूमकर चौक, भुजबळ चौक आणि मुळा नदीवरील पुलाकडे जाताना वाहनांचे अक्षरशः सर्पिल अशा रांगा लागल्या होत्या.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 05, 2025 | 06:22 PM
Severe traffic jam on Ravet-Baner road in Pune, vehicles stuck Pune traffic news

Severe traffic jam on Ravet-Baner road in Pune, vehicles stuck Pune traffic news

Follow Us
Close
Follow Us:

Pune News : पिंपरी: मुंबई–बंगळुरू महामार्गावरील रावेत ते बाणेरदरम्यान गुरुवारी सकाळच्या गर्दीत वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली. विशेषत: वाकड परिसराजवळील भूमकर चौक, भुजबळ चौक आणि मुळा नदीवरील पुलाकडे जाताना वाहनांचे अक्षरशः सर्पिल अशा रांगा लागल्या होत्या. अनेक वाहनचालक सकाळीच या कोंडीत अडकले आणि पुढे जाण्यासाठी त्यांना थांबणे, सिग्नल अडथळे आणि धीम्या गतीने सरकणाऱ्या ताफ्यातून वाट काढावी लागली. काही ठिकाणी तर दोन–तीन वाहने सरकण्यासाठी पाच–दहा मिनिटांचा अवधी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

कोंडीचे प्रमाण वाढण्यामागे स्थानिकांनी काही ठोस कारणेही अधोरेखित केली आहेत. रखडलेले रस्ता रुंदीकरण, अरुंद मुळा नदीवरील पूल, दोन्ही चौकांमधील वाढलेली वाहतूक, त्यातच सेवा रस्त्यांवरील अतिक्रमण यामुळे मुख्य वाहतूक प्रवाह स्वतःच गुदमरल्यासारखा वाटत असल्याचे नागरिकांचे मत आहे. विशेषत: भुजबळ चौक हा हिंजवडी आयटी पार्क, औद्योगिक पट्टा आणि पुणे–मुंबई महामार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहने या मार्गावरून धावतात. वाढत्या आयटी कंपन्या, निवासी प्रकल्प आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे गेल्या काही वर्षांत या रस्त्यावरील वाहनभार सातत्याने वाढत चालला आहे.

हे देखील वाचा : रत्नागिरीत महिलाराज! Local Body Election मध्ये 52 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचे मतदान

२६ किलोमीटर एलिव्हेटेड कॉरिडॉरची योजना कागदावरच

रावेत ते नऱ्हेदरम्यान सहापदरी २४ किमी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्याची योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या प्रकल्पामुळे कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही.

रावेत–वाकडदरम्यान सेवा रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव असला तरी भूसंपादनाचा प्रश्न न सुटल्याने हे काम थांबलेल्या अवस्थेत आहे. महामार्ग प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातील समन्वयाच्या उशिरीचा फटका नागरिकांना बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

भुयारी मार्ग व रुंदीकरणाच्या विलंबाने समस्या तीव्र

बाणेर–रावेत मार्गावरील भुयारी मार्गाचा विस्तार आणि रस्ता रुंदीकरणाचा विलंब हा या संपूर्ण परिसरातील कोंडीचा मुख्य मुद्दा आहे. भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन रुंदीकरणाचे काम तातडीने पूर्ण झाले, तर कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. वाहतूक नियोजन सुधारून अडथळे दूर केल्याशिवाय येथील परिस्थिती बदलणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हे देखील वाचा : ‘यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या 175 जागा आल्या तर भाजपने…’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

कोंडी वाढवणारे अडथळ्यामध्ये काही कारणे समोर आली आहेत. यामध्ये भुयारी मार्गालगत उभी असलेली अनधिकृत दुकाने, अनधिकृत रिक्षा थांबे, रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणाऱ्या गाड्या, अवैध खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा त्रास आणि रस्त्यालगत फळ विक्रेते आणि त्यांची वाहने यामुळे नाहक वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे.

याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहशहर अभियंता बापू गायकवाड यांनी मत मांडले. ते म्हणाले की, “महापालिका हद्दीतील बहुतांश काम आम्ही पूर्ण केले आहे. मात्र महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यांचे रुंदीकरण भूसंपादन न झाल्याने प्रलंबित आहे. ज्या ठिकाणी भूसंपादन पूर्ण झाले, तेथे लवकरात लवकर काम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”

 

Web Title: Severe traffic jam on ravet baner road in pune vehicles stuck pune traffic news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 06:22 PM

Topics:  

  • Bad Roads
  • pune news

संबंधित बातम्या

चंद्रावरच नव्हे, सूर्यावरही पिंपल्स! पुढील दहा दिवस दिसणार दुर्मीळ खगोलीय दृश्य
1

चंद्रावरच नव्हे, सूर्यावरही पिंपल्स! पुढील दहा दिवस दिसणार दुर्मीळ खगोलीय दृश्य

शिक्षक, शिक्षकेतर संघटना आक्रमक! शाळा बंद ठेवून पुण्यात मोर्चा; नेमकं मागण्या काय?
2

शिक्षक, शिक्षकेतर संघटना आक्रमक! शाळा बंद ठेवून पुण्यात मोर्चा; नेमकं मागण्या काय?

मतदार यादीतील दुबार नावांचं करायचं काय? पुणे महापालिका प्रशासनापुढे प्रश्न; निवडणूक आयाेगाला आयुक्तांची विनंती
3

मतदार यादीतील दुबार नावांचं करायचं काय? पुणे महापालिका प्रशासनापुढे प्रश्न; निवडणूक आयाेगाला आयुक्तांची विनंती

वल्लभनगरमध्ये तरुणाचा जीव वाचवण्यासाठी अग्निशामक दलाची धाडसी मोहीम; मोठी दुर्घटना टळली
4

वल्लभनगरमध्ये तरुणाचा जीव वाचवण्यासाठी अग्निशामक दलाची धाडसी मोहीम; मोठी दुर्घटना टळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.