Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar at Satyacha Morcha: लोकशाही वाचवायची असेल तर..; मुंबईतील सत्याच्या मोर्चातून शरद पवारांचा एल्गार

अनेक ठिकाणी बनावट आधारकार्ड तयार केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जेव्हा आम्ही पुरावे दाखवायला सांगितले, तेव्हा ज्यांनी हा प्रकार उघड केला, त्यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 01, 2025 | 06:00 PM
Sharad Pawar at Satyacha Morcha:

Sharad Pawar at Satyacha Morcha:

Follow Us
Close
Follow Us:
  • आजचा मोर्चा हा संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आठवण करून देणारा
  • लोकशाहीसाठी आपल्याला एकत्र यावंच लागेल
  • अनेक ठिकाणी बनावट आधारकार्ड तयार केल्याच्या तक्रारी

Sharad Pawar Speech at Satyacha Morcha Mumbai: “विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात जे प्रकार उघडकीस आले त्यामुळे संसदीय लोकशाहीला धक्का बसला आहे. आता या लोकशाहीसाठी आपल्याला एकत्र यावंच लागेल. राज्यात जे मतचोरीचे प्रकार सुरू आहेत, ते थांबवणे गरजेचे आहे. त्यासाठी सगळेजण एक होऊया,” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार केलं आहे. आज मुंबईत मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाविरोधात ‘सत्याचा मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.

Powai Hostage Case:”मी स्टुडिओत पोहोचलो अन्..” रोहित आर्यासंदर्भात गिरीश ओक यांनी केला धक्कादायक खुलासा

“आजचा मोर्चा हा संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आठवण करून देणारा आहे. त्या काळात काळा घोडा परिसरात मोठे आंदोलन झाले होते. आज तुम्ही दाखवलेली एकजूट त्याच काळातील ऐक्याची आठवण करून देते,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. “विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घटनांनी संसदीय लोकशाहीला धक्का बसल्याचे दिसले. उत्तमराव जानकर यांनी सत्तेचा गैरवापर कसा होतो हे स्पष्टपणे सांगितले. राजकीय मतभेद असू शकतात, पण आता ते बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यायला हवे. लोकशाहीत नागरिकांचा मताचा अधिकार जपणे हे आपले कर्तव्य आहे.” असही त्यांनी स्पष्ट केलं.

“अनेक ठिकाणी बनावट आधारकार्ड तयार केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जेव्हा आम्ही पुरावे दाखवायला सांगितले, तेव्हा ज्यांनी हा प्रकार उघड केला, त्यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. “जे पुरावे सादर करतात, त्यांच्यावरच कारवाई केली जाते, हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. आज आपल्याला ठाम निर्णय घ्यायचा आहे. मतभेद असले तरी लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे “सध्या जी मतचोरी सुरू आहे, ती थांबवली पाहिजे. विचारधारा वेगळी असली तरी लोकशाहीसाठी सगळ्यांनी एक होण्याची वेळ आली आहे.” असंही शरद पवार यांनी नमुद केलं.

Uddhav Thackeray Attacks On BJP: मतदार यादीतून नाव हटवण्याचा प्रयत्न?; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या प्रकरणावर तीव्र शब्दांत चिंता व्यक्त केली आणि मतदार यादीतील अयोग्य नोंदी हटवण्याची मागणी केली. “सगळेच बोलत आहेत — आम्ही बोलतोय, भाजपचे लोक बोलतायत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील लोकही बोलतायत. मग निवडणुका घ्यायची घाई का?” मतदार याद्या स्वच्छ आणि पारदर्शक केल्याशिवाय कोणतेही यश-अपयश स्पष्ट होणार नाही. यावेळी राज ठाकरे यांनी सभेत दुबार मतदारांचे पुरावेदेखील सादर केले. “आज मी इकडे पुरावा घेऊन आलो आहे. दुबार मतदारांची याद्या आणि त्यांची कागदपत्रे येथे आहेत,” असे ते म्हणाले. आता जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा याद्यांवर काम करावे आणि प्रत्येक चेहरा समाजाला दाखवावा. “दुबार-तिबार ज्या ठिकाणी आले आहेत, तिथेच त्यांना ओळखा, फोडून काढा आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात द्या,” अशी सूचना ठाकरे यांनी केली.

 

Web Title: Sharad pawar at satyacha morcha if you want to save democracy sharad pawars appeal from the satyacha morcha in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • Mumbai
  • raj thackeray
  • Sharad Pawar
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

मोठी बातमी! लवकरच निवडणुकांची घोषणा? तीन टप्प्यात निवडणुका, पहिल्या टप्प्यात नगरपालिका, तर महापालिका निवडणुका…
1

मोठी बातमी! लवकरच निवडणुकांची घोषणा? तीन टप्प्यात निवडणुका, पहिल्या टप्प्यात नगरपालिका, तर महापालिका निवडणुका…

Uddhav Thackeray Attacks On BJP: मतदार यादीतून नाव हटवण्याचा प्रयत्न?; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
2

Uddhav Thackeray Attacks On BJP: मतदार यादीतून नाव हटवण्याचा प्रयत्न?; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Raiagad News :  वादळात अडकलं जहाज अन् ; सोळा खलाशांना वाचवणारा ठरला देवदूत, अंगावर काटा आणणारा सुटकेचा थरार
3

Raiagad News : वादळात अडकलं जहाज अन् ; सोळा खलाशांना वाचवणारा ठरला देवदूत, अंगावर काटा आणणारा सुटकेचा थरार

MVA-MNS Mumbai Morcha: बोगस मतदान, मतपेटीचा घोळ झाला तर…; ठाकरे गटाच्या नेत्याची खुली धमकी
4

MVA-MNS Mumbai Morcha: बोगस मतदान, मतपेटीचा घोळ झाला तर…; ठाकरे गटाच्या नेत्याची खुली धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.