Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

ठाणे जिल्ह्यातल्या महापालिकांमधील इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शनिवारपासून सुरु होणार आहे. महापालिकांमधील सदस्य संख्येच्या चार ते पाचपट इच्छुक असल्याने उमेदवारांचा कस लागणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 19, 2025 | 07:36 PM
ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

Follow Us
Follow Us:
  • उमेदवारी मिळवण्यासाठी महिलांकडूनही मोठा प्रतिसाद, १५४८ महिलांचे अर्ज
  • ठाणे महापालिका निवणुकीत उमेदवारीसाठी १२७७ जण इच्छुक
  • आजपासून इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम
ठाणे : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेतून उमेदवारी मिळावी, यासाठी ३३४८ इच्छुकांनी मुलाखतीचे अर्ज भरले आहेत. यात १५४८ महिलांनी उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. ठाणे जिल्ह्यातल्या महापालिकांमधील इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शनिवारपासून सुरु होणार आहे. महापालिकांमधील सदस्य संख्येच्या चार ते पाचपट इच्छुक असल्याने उमेदवारांचा कस लागणार आहे.

महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर या सहा महापालिकांचा समावेश आहे. मागील चार दिवसांत या सहा महापालिकामधील एकूण ६१८ सदस्य पदांसाठी शिवसेना पक्ष कार्यालयातून ३३४८ इच्छुकांनी मुलाखतीचे अर्ज सादर केल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याचे खासदार म्हस्के म्हणाले.

KDMC Election 2025 : केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार

खासदार म्हस्के म्हणाले की ठाणे महापालिकेत १३१ सदस्य असून पक्ष कार्यालयात १२७७ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेची सदस्य संख्या ११२ असून यासाठी ६८२ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. उल्हासनगर महापालिकेची सदस्य संख्या ७८ असून यासाठी शिवसेनेकडे ३८५ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत.

नवी मुंबई महापालिकेत १११ सदस्य संख्या असून एकूण ४९६ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती वाशी येथे शनिवारी होतील, असे खासदार म्हस्के म्हणाले. भिवंडी निजामपूर महापालिकेत ९० जागा असून यासाठी १७६ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. ९६ सदस्य संख्या असलेल्या मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी ३३२ इच्छुकांनी अर्ज केले आहेत.

शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना महायुतीमधून महापालिका निवडणूक लढवेल, अशी घोषणा यापूर्वीच केलेली आहे. त्यानुसार महापालिकांच्या स्तरावर शिवसेना आणि भाजपची जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. मुंबईतून २७०० हून अधिक इच्छुकांनी शिवसेनेतून उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखत दिली होती. यात प्रामुख्याने महिला उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती.

बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग! कॉंग्रेसची सत्ता घालवण्याचा इतर पक्षांचा प्रयत्न

Web Title: 3348 aspirants from shiv sena for six municipalities in thane district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 07:36 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • thane

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
1

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?
2

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
3

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
4

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.