Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र, राज्य सरकारची भूमिका बघ्याचीच; राज्यपालांबाबत केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल: शरद पवार

शरद पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून असेल. यामध्ये सर्वसामान्यांचा संताप दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई न करता, केंद्र आणि राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 16, 2022 | 05:54 PM
केंद्र, राज्य सरकारची भूमिका बघ्याचीच; राज्यपालांबाबत केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल: शरद पवार
Follow Us
Follow Us:

मुंबई – ज्या पद्धतीचे विधान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शिवछत्रपतीबद्दल केले ते चुकीचे होते. या मुद्द्यावर केंद्र आणि राज्यसरकारने बघ्याची भूमिका घेतली. यामुळेच लोकांमध्ये संताप आहे, परंतु मला खात्री आहे आज ना उद्या केंद्र सरकारला यावर निर्णय घ्यावा लागेल असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या मोर्चाला​​​​​​परवानगीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक संकेत दिले होते. मोर्चा हा लोकशाहीचा अधिकार आहे असे ते म्हणाले, त्यामुळे मोर्चाला परवानगी दिल्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. राज्यात महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये राग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबाबत जबाबदार लोकांनी केलेली वक्तव्ये सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी आहेत. त्याची प्रतिक्रिया उद्या मोर्चात दिसेल.

शरद पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून असेल. यामध्ये सर्वसामान्यांचा संताप दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई न करता, केंद्र आणि राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली.

शरद पवार म्हणाले, उदयनराजेंची भूमिका चांगली घेतली. त्याचे आम्हालोकांना समाधान आहे. राज्यसरकार आणि केंद्र सरकारने जी काळजी घ्यायची ती घेतली नाही. दोन्ही सरकारची भूमिका बघ्याची आहे त्याबद्दल लोकांच्या मनात संताप आहे.

महापुरुषांबद्दल जी वक्तव्ये केली त्याबाबत लोकांमध्ये संताप आहे. शाळा काढण्यासाठी या महापुरुषांनी भीक मागितली हे वक्तव्य संतापजनक आणि दुर्दैवी आहे. याबाबत राज्यकर्त्यांना तारतम्य नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांनी मुलांना जेवायचा प्रश्न आला तेव्हा स्वत:च्या पत्नीचे दागिने विकले ते काय भीक मागून नव्हे.

Web Title: Sharad pawar on central govt over bhagat singh koshyari controversial statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2022 | 05:54 PM

Topics:  

  • Bhagat Singh Koshyari
  • BJP
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली
1

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
2

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका
3

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका

आता थांबायचं नाय…! आंदोलकांवरील लाठीचार्ज पाहून Sonam Wangchuk यांचा मोठा निर्णय; 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज
4

आता थांबायचं नाय…! आंदोलकांवरील लाठीचार्ज पाहून Sonam Wangchuk यांचा मोठा निर्णय; 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.