नाशिक: विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यभरात ते स्वत: दौरे आणि सभाही घेताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी शरद पवार यांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज (23 सप्टेंबर) नाशिकमध्ये दाखल होत आ हेत. पुढील तीन दिवस ही यात्रा नाशिकमध्ये मुक्काम करणार आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का देण्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
नाशिकमध्ये दाखल झालेल्याया शरद पवार यांचम्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आदी नेत्यांनी तळ ठोकला आहे. अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील जवळपास सहा आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली. यात पहिले म्हणजे छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, सरोज अहिरे, नितीन पवार, दिलीप बनकर आणि माणिकराव कोकाटे हे आमदार अजित पवार यांच्यासोबत महायुतीत सामील झाले.
हेही वाचा: चेस ऑलिम्पियाड चॅम्पियन टीम इंडियाचे मोलाचे क्षण! युवा खेळाडूंनी केली कमाल
पण आगामी निव़णुकीत या सर्व आमदारांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने प्लॅनिंग सुरू केलं आबहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे हे नेते नाशिकमध्ये जंगी सभा घेणार आहेत. अजित पवार यांचे जवळचे मानले जाणाऱ्या छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातही मोठी सभा होणार आ हे,
आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, सटाणा, देवळा मार्गे नाशिकमध्ये दाखल होईल. याठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची जंगी सभा होईल. त्यानंतर मंगळवारी (24 सप्टेंबर) आणि बुधवारी(25 सप्टेंबर) जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रेच्या सभा होतील. त्यामुळे नाशिकमध्य पुढील तीन दिवस राजकीय धुराला उडणार आहे.
हेही वाचा: वृषभ, सिंह, मकर राशीच्या लोकांना अमृत सिद्धी योगाचा लाभ