शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या शिबीराला उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर शिर्डी येथे आजपासून सुरू झाले असून, उद्या (शनिवारी) ५ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईहून हेलिकॉप्टरने शरद पवार हे शिर्डी येथे दाखल होऊन या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. असं यावेळी तपासे म्हणाले.