Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवारांची चिपळूण पत्रकार परिषद- मनोज जरांगेंना पाठिंबा, मुंबई-गोवा महामार्गाबाबत नाराजी…

राष्ट्रवादी कॉंगेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दि. 23 सप्टेंबर रोजी चिपळूण येथे पत्रकारपरिषद घेतली त्यावेळी त्यांनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिला तसेच मुंबई गोवा मार्गाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

  • By नारायण परब
Updated On: Sep 23, 2024 | 09:21 PM
पवारांच्या उमेदवाराचे काम करण्यास नकार

पवारांच्या उमेदवाराचे काम करण्यास नकार

Follow Us
Close
Follow Us:

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्वाची बैठक ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तेव्हा घटक पक्षातील कोणी विधानसभेच्या कुठल्याही जागेवर दावा केला, तरी याचा अंतिम निर्णय हा तिन्ही पक्षांच्या एकत्रित होणाऱ्या बैठकीनंतरच जाहीर केला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील स्वा. सावरकर मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेआधी पवार यांनी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, उमेदवारीची इच्छा असणे स्वाभाविक आहे. परंतु हा निर्णय एका पक्षाचा राहिलेला नाही. तो महाविकास आघाडीचा निर्णय असून तो एकत्रित घेतला जाणार आहे. त्यामुळे यासंदर्भातील आता होणारे दावे निरर्थक आहेत. जर का कोणी उमेदवारीचा आताच दावा करत असेल, तर त्यांच्या बाबतीत ‘बाजार तुरी आणि कोण कोणाला मारी’, असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागेल, असे स्पष्ट केले.

मनोज जरांगेंना पाठिबा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. जरांगे यांची मागणी योग्य असल्याने आरक्षणाला पाठिंबा आहे. त्याशिवाय इतर छोट्या छोट्या समाजाचाही विचार व्हावा व त्यांना आरक्षणा सामावून घेण्यात यावे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

उभ्या आयुष्यात असा रस्ता पाहिला नाही!

चिपळुणातील जाहीर सभेसाठी खासदार शरद पवार हे कराड मार्गे कुंभार्ली घाटाने आले. या रस्त्यावर पाठण, हेळवाक दरम्यान पडलेल्या खड्ड्यांविषयी बोलताना खासदार पवार यांनी उभ्या आयुष्यात असा रस्ता मी पाहिला नाही, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. एका वर्षात तीन वेळा या रस्त्याची दुरुस्ती केली म्हणे, राज्यात महायुतीचा हा असाच कारभार सुरू राहिला, तर एक दिवस देश खातील, अशीही खंत व्यक्त केली

मुंबई-गोवा महामार्गाबाबत नाराजी, सत्ता आल्यास भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढू

कोकणातील प्रमुख मार्ग असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत खासदार पवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. १४ वर्षे होऊनही हा प्रकल्प पूर्ण होत नसेल, तर ते सरकारचे मोठे अपयश आहे. यामध्ये निश्चित भ्रष्टाचार झालेला आहे. या कामाविषयी जेवढ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत, तेच या कामाच्या निकृष्ट दर्जाचा दाखला आहे. तेव्हा या रस्त्याच्या कामाबद्दल लोकं जर तक्रारी करत असतील, तर ते अजिबात चुकीचे नाही. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास या कामातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढू, असा इशाराच खासदार पवार यांनी दिला.

 

 

Web Title: Sharad pawars chiplun press conference support for manoj jarang displeasure about mumbai goa highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 09:21 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai-Goa highway

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
3

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
4

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.