Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिका निवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सक्रिय; कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या काेअर कमिटीची निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 25, 2025 | 11:59 AM
महापालिका निवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सक्रिय; कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या काेअर कमिटीची निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडली आहे. या बैठकीत निवडणूक रणनीती, संभाव्य आघाड्यांचे पर्याय, तसेच शहरातील प्रमुख समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय स्तरावर सुरु असलेल्या प्रभाग रचनेविषयीच्या प्रक्रियेत उद्भवू शकणाऱ्या तक्रारींची जबाबदारी माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

पक्षाने भाजपच्या मागील सत्ताकाळावर तीव्र टीका करत, नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पावसाळ्यातील पाणी साचण्याचे प्रश्न, पर्यावरणाची होणारी हानी आणि विकास प्रकल्पातील अनियमितता यामुळे पुणेकर त्रस्त असल्याचे अधोरेखित केले. हे मुद्दे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला.

निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश

शहरातील पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. सर्व फ्रंटल सेल्स आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीत विविध धोरणात्मक आणि संघटनात्मक विषयांवरही चर्चा झाली. या बैठकीस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जयदेव गायकवाड, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार कमल ढोले पाटील, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, विशाल तांबे, अश्विनी कदम, श्रीकांत पाटील, सचिन दोडके, भगवान साळुंखे, डॉ. सुनील जगताप, पंडित कांबळे, प्रकाश म्हस्के यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Sharad pawars ncp has held a meeting in pune for the pune municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 11:59 AM

Topics:  

  • Ncp Mla
  • NCP Sharad Pawar
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
2

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष
4

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.