Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेखर चरेगांवकर यांचा जामीन फेटाळला, सरकारी वकिलांच्या परखड युक्तिवादानंतर न्यायालयाचा निर्णय

जिल्ह्यातील कराडमध्ये गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज आज कराड न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे आता चरेगांवकर यांना जामिनासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागणार आहेत.

  • By विवेक
Updated On: Jun 05, 2026 | 08:48 PM
Shekhar Charegaonkar's bail rejected, Shekhar Charegaonkar, Satara, Satara News,

Shekhar Charegaonkar's bail rejected, Shekhar Charegaonkar, Satara, Satara News,

Follow Us
Follow Us:

सातारा : जिल्ह्यातील कराडमध्ये गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज आज कराड न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे आता चरेगांवकर यांना जामिनासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागणार आहेत. सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या यशवंत बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर त्यांनी जामीनाचा प्रयत्न केला होता, तो फेटाळण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी, 112 कोटी रुपयांच्या यशवंत बँक घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या खटल्याची सुनावणी कराडच्या पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांच्यासमोर सुरू होती. दोन दिवसांपूर्वी बचाव पक्षाचे वकील मुंदरगी यांनी युक्तिवाद करत खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या चुकीच्या प्रेस कॉन्फरन्समुळे ठेवीदारांनी बँकेतल्या ठेवी काढून घेतल्या. त्याचा फटका बँकेला बसल्याचे सांगितले. तसेच जी कर्जे काढली आहेत, त्यांच्या परतफेडीसाठी बँक 101 नुसार कर्जदारांवर कारवाई करत आहे. त्यामुळे चरेगांवकर यांना जामीन देण्यास हरकत नसावी, असा दावा करत मुंदरगी यांनी शेखर चरेगांवकर यांच्यावर केवळ राजकीय दबावापोटी हा खटला घालण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले.

भिवंडीत ‘मिथेनॉल’चा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई

हे मुद्दे खोडून काढताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जाधव यांनी सांगितले की, जर मेधा कुलकर्णी यांच्या प्रेस कॉन्फरन्स मुळे बँकेवर परिणाम झाला असेल आणि जर ती प्रेस कॉन्फरन्स खोटी होती, तर बँक किंवा चरेगांवकर यांनी खासदार कुलकर्णी यांच्याविरोधात आजपर्यंत मानहानीचा दावा का दाखल केला नाही? बोगस कर्ज प्रकरणे करून यशवंत बँकेचे अध्यक्ष तसेच संचालक मंडळाने त्यांच्यावर सर्वसामान्यांनी दाखवलेल्या विश्वासाला काळीमा फासण्याचे काम केले आहे. याचबरोबर कोणताही राजकीय दबाव या खटल्यामध्ये दिसून येत नाही. चरेगावकर यांच्याकडून अधिक माहिती तसेच ठेवीदारांच्या कष्टाने कमावलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी चरेगांवकर यांच्या जामीन नाकारण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली होती.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी यशवंत बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता पुढील जामीनासाठी चरेगांवकर यांना उच्च न्यायालयाकडे धाव घ्यावी लागणार आहे.

Maharashtra Rain Alert: पुणेकर सावधान! पुढील तीन दिवसांत मेघगर्जना अन्…; IMD कडून ‘यलो’ अलर्ट जारी

Web Title: Shekhar charegaonkars bail rejected courts decision after strong arguments from government prosecutors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Satara
  • Satara Crime News
  • Satara News

संबंधित बातम्या

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
1

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
2

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
3

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप
4

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.