Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेरसिंग डागोर यांची ठाणे महापालिकेस भेट! अनेक योजनांचा घेतला आढावा

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी ठाणे महापालिकेस भेट देऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतन, सुविधा, आणि कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 25, 2025 | 08:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रूक्कानसिंग डागोर यांनी आज ठाणे महापालिकेस भेट देवून महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्वाचा घटक असून शहराचे सौंदर्य ठिकवून ठेवण्याचे काम ते सातत्याने करत असल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रूक्कानसिंग डागोर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.

पुणेकरांसाठी खुशखबर! Metro च्या ‘या’ टप्प्याला केंद्र सरकारची मंजूरी; कसा असणार प्रोजेक्ट? पहाच…

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रूक्कानसिंग डागोर यांनी आज महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव,अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी.गोदेपुरे, उपाआयुक्त मनीष जोशी, अनघा कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉ राणी शिंदे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप आदी अधिकाऱ्यांसह सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

ठाणे महापालिकेच्यावतीने सफाई कामगारांसाठी निवारा, एकूण कार्यरत सफाई कर्मचारी, तात्पुरते सफाई कर्मचारी, त्यांची पदोन्नती, वेतन, आरोग्यविषयक सुविधा तसेच महापालिकेच्या घनकचरा व मलनिःसारण विभागांतर्गत मनुष्यबळ, रिक्त जागा, पदोन्नती, कर्मचाऱ्यांचे भत्ते, वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्त्या आदीबाबत उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, यांनी सविस्तर माहिती दिली. सफाई कर्मचारी हा महत्वाचा घटक असून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.

सफाई कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम, वैद्यकीय सुविधा, पी एफ, नवीन भरती प्रक्रिया तसेच लाड-पागे धोरणानुसार वारसा हक्काची प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत. सफाई कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याची कार्यवाही ३० दिवसात करावी, तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरीत सामावून घ्यावे. त्याचप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांना रूग्णालयात कॅशलेस सुविधा उपलब्ध होतील या दृष्टीने योजना तयार करावी. ठाणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना देखील आरोग्यविषयक सर्व सुविधा द्याव्यात, कंत्राटी कर्मचा-यांना जर ठेकेदार पगार वेळेत देत नसेल तर त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करुन त्याला काळ्या यादीत टाकावे तसेच महापालिका सेवेत २५ वर्षं पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे मिळतील या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना शेरसिंग डागोर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.

पनवेल पालिका प्रशासनाची फेरीवाल्यांविरोधात कारवाई; मात्र राजकीय पुढारी आपला फोटो लावून…

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचात्यांसाठी उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे, मासिक वेतन वेळेवर अदा करणे, सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे फायदे हे सेवानिवृत्तीदिवशीचदिले जातात. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य साधन दिली जातात, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते तसेच महिला कर्मचाऱ्यांची मॅमोग्राफी तपासणी केली जाते या सुविधांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Sher singh dagor visits thane municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 08:50 PM

Topics:  

  • Thane Hospital
  • Thane news

संबंधित बातम्या

Dombivli News : रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत डोंबिवलीत नांदी संमेलन; AIपासून मराठी भाषेपर्यंत चर्चा
1

Dombivli News : रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत डोंबिवलीत नांदी संमेलन; AIपासून मराठी भाषेपर्यंत चर्चा

Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल
2

Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल

THANE : ‘भयमुक्त ठाण्या’साठी ९ ऑक्टोबरला मोर्चा; कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक
3

THANE : ‘भयमुक्त ठाण्या’साठी ९ ऑक्टोबरला मोर्चा; कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द
4

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.