
भारतात होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये जिल्ह्यातील खेळाडू खेळणार
जिल्हाभरात ३२ ठिकाणी ३२ खेळांचा थरार या क्रीडा संग्रामांतर्गत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील ३२ विविध ठिकाणी तब्बल ३२ प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांना जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, तब्बल ७५ हजार स्पर्धकांनी यात आपला सहभाग नोंदवला आहे.
ऑलिम्पिक २०३६ चे ध्येय आणि स्थानिक खेळाडूंना संधी उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या उपक्रमामागील आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “आपल्या परिसरातील अनेक तरुण खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे; मात्र योग्य व्यासपीठाअभावी त्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही. स्थानिक पातळीवरील हेच टॅलेंट शोधून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी खासदार क्रीडा संग्राम सुरू करण्यात आला आहे.”
पुढे बोलताना त्यांनी २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धांचा विशेष उल्लेख केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्याचे स्वप्न असून, त्यादृष्टीने देशपातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात भारतात ऑलिम्पिक झाल्यास, त्यात ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनीही देशाचे प्रतिनिधित्व करावे आणि पदके जिंकावीत, हा या क्रीडा संग्रामाचा मुख्य उद्देश आहे,” असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.
लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना! सातवी ते बारावीच्या मुलींना वर्षाला 6 हजार रुपये
स्थानिक खेळाडूंना योग्य संधी, प्रोत्साहन आणि अद्ययावत व्यासपीठ उपलब्ध करून देत भविष्यातील ऑलिम्पिकपटू घडवण्याच्या दिशेने ‘खासदार क्रीडा संग्राम’ हा एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी नमूद केला. या उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ans: खासदार क्रीडा संग्रामचे उद्घाटन डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी मंत्री दादा भुसे, प्रताप सरनाईक, उदय सामंत आणि आमदार राजेश मोरे उपस्थित होते.
Ans: या क्रीडा महोत्सवात संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील ३२ ठिकाणी ३२ विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, तब्बल ७५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.