पनवेल शहरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण
पनवेल: पालिका प्रशासन एकीकडे फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत आहेत. मात्र त्याच वेळी राजकीय पुढारी मात्र फेरीवाल्यांना संरक्षण देत असल्याचे पाहायला मिळत असून कामोठे वसाहतीत चक्क स्थानिक नेत्याच्या सहकार्याने असे फलक लावून खाद्य पदार्थ विक्री केली जात असल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे नावा सोबतच जाहिरातीसाठी फोटोचा वापर देखील केला जात असल्याने वसाहतीमधील रस्ते या नेत्यांनी फेरीवल्यांना आंदण दिले आहे का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
रस्त्यावर जागा मिळेल तिथे अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांचे पेव सध्या पालिका हद्दीत फुटले आहे. राजकीय पुढऱ्यांच्या पाठबळामुळे पादचाऱ्यांचा चालण्याचा हक्क हिरावून फेरीवाले व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून फेरीवल्यानं विरोधात कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमण विरोधी पथकाकडून करण्यात येत असलेली कारवाई थांबवण्यासाठी राजकीय नेते आशिकाऱ्यांवर दबाव आणत असल्यामुळे फेरीवाल्या विरोधात होणारी कारवाई अनेकदा थांबवण्यात येते. याचाच फायदा घेण्यासाठी अनधिकृत पणे व्यवसाय करणाऱ्यांनी आता नवीन शक्कल लढवल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या अनधिकृत दुकानावर स्थानिक पुढऱ्याचे फोटो आणि नाव वापरून यांच्या सहकार्याने हे दुकान सुरु केले असल्याचे भासवून कारवाई साठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचे काम केले जात आहे.
फेरीवाल्यांमुळे अपघात
कामोठे वसाहती मधील पद पथ फेरीवल्यानी व्यापल्याने नाईलाजाने रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांचे अपघात घडले आहेत.या मुळे रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवल्याना पाठबळ देणाऱ्या उत्साही कार्यकर्त्यांना त्यांच्या वरिष्ठानीं लगाम घालण्याची गरज असल्याचे मत कामोठे मधील नागरिक व्यक्त करत आहेत.
कोणत्याही प्रकारे अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या व्यवसईकांना आवरण्याचे काम प्रशासनाणे करणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यानीं कारवाईत अडथळा आणणे चुकीचे आहे.
– अमोल शितोळे, अध्यक्ष. शेतकरी कामगार पक्ष कामोठे.
राजकीय नेत्यांच्या फोटोचा वापर करून जर कोणी रस्त्यावर अनधिकृत पणे व्यवसाय करत असेल आणि कारवाईवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या विरोधात निश्चित कारवाई केली जाईल
– दशरथ भंडारी, प्रभाग अधीक्षक. प्रभाग क्रमांक क