Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shinde-Fadnavis Dispute: शिंदे–फडणवीस यांच्यात नाराजी; नेमकं बिनसलं कुठे?

या घडामोडींमुळे शिंदे–फडणवीस यांच्यातील समीकरणांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या चर्चांना फेटाळून लावले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 25, 2025 | 09:45 AM
Shinde-Fadnavis Dispute: शिंदे–फडणवीस यांच्यात नाराजी; नेमकं बिनसलं कुठे?
Follow Us
Close
Follow Us:

Shinde-Fadnavis Dispute: राज्यातील सत्ताधारी युतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. नगरविकास विभागाच्या कारभाराबाबत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. केंद्र सरकारच्या योजनांचे पुनरावलोकन करण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरविकास विभागाच्या कामकाजावर फडणवीसांनी ताशेरे ओढले असून अधिकाऱ्यांनी तातडीने सुधारणा कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या असल्याचे समजते.

 मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या निधीतून राबवल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी समाधानकारक नसल्याचे म्हटले आहे. यात तातडीने सुधारणा करणून या योजनांना गती देण्याचे निर्देशही दिले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एकनथ शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठका सातत्याने टाळत असून या बैठकांना अनुपस्थित राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. पण दोन दिवसांपूर्वी झालेल्या मराठा आंदोलन व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात झालेल्या बैठकीला मात्र शिंदे उपस्थित होते. पण नगरविकास विभागाच्या कामकाजात होत असलेल्या अनियमिततेमुळे फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील दुरावा अधिकच वाढल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात आज तेजीचा माहोल! सेन्सेक्स-निफ्टी करणार सकारात्मक सुरुवात,

केंद्र शासनाकडून ‘अमृत’ योजनेअंतर्गत नागरी भागातील पाणीपुरवठा, मलनिःसारण, हरित उद्याने आणि सरोवर पुनरुज्जीवन यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरी भागातील जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्याची क्षमता आहे. त्यामुळे जी कामे प्रलंबित आहेत ती ३१ मार्च २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या योजनेतून राज्याला सुमारे ९ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे. फडणवीस यांनी यंत्रणांना ‘मिशन मोड’ वर काम करण्याचे आणि अमृत अभियानांतर्गत प्रलंबित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्याचे आदेशही त्यांनी दिले.याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक जबाबदाऱ्या पार पाडून कामांना गती द्यावी, असही त्यांनी म्हटलं आहे.

‘वॉर रूम’ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आदेश विविध विभागांना दिले आहेत. तसेच प्रकल्प पूर्ण करण्यास उशीर करून नये, यासाठी जागेच्या परवानग्या मिळाल्यानंतरच काम सुरू करावे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. विविध विभागांकडून आवश्यक परवानग्या आगाऊ स्वरूपात दिल्यास काम तातडीने सुरू होऊ शकते. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या प्रकल्पांत पहिल्या टप्प्याचे काम सुरू करताच पुढील टप्प्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यावर भर द्यावा.

Budget Trips : परदेशातील ‘ही’ 3 ठिकाणे भारतापेक्षा स्वस्त; बजेटमध्ये घ्या अविस्मरणीय प्रवासाचा आनंद

नागरिकांना दर्जेदार आणि सहज आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ ची कामे वेगाने पूर्ण करावेत. आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील लोकसंख्येचा विचार करून वैद्यकीय मनुष्यबळाची सद्यस्थिती व भविष्यातील गरजांचा अभ्यास करावा, असेही आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.

Web Title: Shinde fadnavis dispute dissatisfaction between shinde and fadnavis where exactly is the disagreement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 09:20 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

अतिच झालं! मनोज जरांगे पाटलांनी आता केली हद्द, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईचा अपमान? पहा व्हिडिओ
1

अतिच झालं! मनोज जरांगे पाटलांनी आता केली हद्द, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईचा अपमान? पहा व्हिडिओ

Shivsena : राज ठाकरेंना मोठा झटका, दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
2

Shivsena : राज ठाकरेंना मोठा झटका, दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Thane Politics: ठाण्यात प्रभागरचनेवरून गणेश नाईक- एकनाथ शिंदेंमध्ये वादाचा भडका; ठाकरे गटही आक्रमक
3

Thane Politics: ठाण्यात प्रभागरचनेवरून गणेश नाईक- एकनाथ शिंदेंमध्ये वादाचा भडका; ठाकरे गटही आक्रमक

Aaditya Thackeray on Eknath Shinde: “शिंदेंनी महाराष्ट्राला लुटले!”- रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
4

Aaditya Thackeray on Eknath Shinde: “शिंदेंनी महाराष्ट्राला लुटले!”- रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.