मंत्रिमंडळ खातेवाटपासाठी शिंदे-फडणवीस यांच्यात बैठक
महायुतीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे शपथविधी झाल्यानंतर आता महायुतीच्या गोटात आता मंत्रिमंडळाच्या हालचाली सुरू झाल्या आहे. मंत्रिमंडळातील खातेवाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. हिवाळी अधिवेशनाआधी फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे.
येत्या 16 ते 21 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करायचा असल्याने मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी द्यायची, कोणाला कोणती खाती द्यायची, यासंदर्भात दोन्ही नेत्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दोन्ही नेत्यांनी तासभर चर्चा केली. यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला 10 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद आणि नगरविकास खात्याची मागणी केली होती. पण भाजपने गृहमंत्रीपद सोडण्यास नकार दिला. त्यामुळे बऱ्याच नाट्यमय घडामोडीही झाल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा खातेवाटपासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चासत्र सुरू झाले आहे
दरम्यान, आज राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी नियक्ती केली जाणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहूल नार्वेकप यांनी एकट्याने अर्ज भरल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार आहे.