Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde- Raj Thackeray Visit: शिवतीर्थावर शिंदे-राज ठाकरे भेट; बीएमसी निवडणुकीपूर्वी बंद दाराआड चर्चा

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत निर्णायक ठरू शकते. शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे एकत्र आल्यास भाजपप्रणीत युतीसाठी ती एक मोठी ताकद ठरू शकते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 16, 2025 | 12:48 PM
Eknath Shinde- Raj Thackeray Visit: शिवतीर्थावर शिंदे-राज ठाकरे भेट; बीएमसी निवडणुकीपूर्वी बंद दाराआड चर्चा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यातच उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी, १५ एप्रिल रोजी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दिलेल्या सदिच्छा भेटीने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

माहीम मतदारसंघातील मतभेदावरून निर्माण झाली होती दरी

विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात शिंदे गटाचे सदा सरवणकर हे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्याविरोधात मैदानात उतरले होते. सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे दोघांमध्ये काहीसा राजकीय दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, यावेळच्या भेटीने दोघांमधील संबंधांमध्ये मुरलेली ताणतणावाची सल काहीशी निवळली असल्याचे संकेत मिळत आहेत.

झहीर आणि सागरिका झाले आई- बाबा; गोंडस बाळाचा फोटो शेअर करून दिली आनंदाची बातमी!

“ही एक सदिच्छा भेट होती” – एकनाथ शिंदे

राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी ही बैठक सुमारे दोन तासांहून अधिक काळ चालली. यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “ही पूर्णपणे सौहार्दपूर्ण भेट होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. काही कारणांनी आमची भेट थांबली होती, ती आज झाली. प्रत्येक भेटीला राजकीय रंग देणे योग्य नाही.”

शिवसेना-मनसे एकत्र आल्यास आनंद – उदय सामंत

या भेटीवर प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले, “एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी गेले म्हणजे त्याचा काही ना काही राजकीय अर्थ असणार. मात्र, जर राज ठाकरे आमच्यासोबत आले तर त्याचे स्वागतच होईल. शिंदे आणि राज यांचे संबंध खूप जुने आहेत.”

Amravati Airport : अखेर अमरावतीकरांची प्रतिक्षा संपली! विमानतळाचे मुख्यमंत्री फडणवीसांचे हस्ते लोकार्पण

राजकीय समीकरणांच्या शक्यता वाढल्या

राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत निर्णायक ठरू शकते. शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे एकत्र आल्यास भाजपप्रणीत युतीसाठी ती एक मोठी ताकद ठरू शकते. यामुळे विरोधकांसमोरही नवे आव्हान उभे राहू शकते.

Web Title: Shinde raj thackeray meet at shivtirtha closed door discussions before bmc elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 12:47 PM

Topics:  

  • BMC Elections
  • Eknath Shinde
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Eknath Shinde : “निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात
1

Eknath Shinde : “निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती
2

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती

Maharashtra Politics: शरद पवार गेम फिरवणार! राज ठाकरेंची मनसे MVA मध्ये करणार प्रवेश? भाजपसाठी हा मोठा धक्का
3

Maharashtra Politics: शरद पवार गेम फिरवणार! राज ठाकरेंची मनसे MVA मध्ये करणार प्रवेश? भाजपसाठी हा मोठा धक्का

Thane Politics: भाजपच्या माजी नगरसेवकाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण; ठाण्यात राजकारण तापणार
4

Thane Politics: भाजपच्या माजी नगरसेवकाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण; ठाण्यात राजकारण तापणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.