Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोल नाक्याच्या मनमानीवरून शिवसेना आक्रमक ; खासगी बसकडून दाेनवेळा जबरदस्तीने टोल वसुली

शिवसेनेचे वाहतूक सेनेचे पदाधिकारी विक्रांत गावडे यांच्या स्वतःच्या खासगी बसकडून आनेवडी टोल नाक्यावर जबरदस्तीने दोन वेळा टोल वसुली करण्यात आली. गाडीमध्ये प्रवाशी असल्याने वाहन चालक यांनी वाद न घालता फास्टट्याग मधून पैसे कट करून घेण्यास सांगितले.

  • By Aparna
Updated On: Dec 02, 2022 | 06:34 PM
टोल नाक्याच्या मनमानीवरून शिवसेना आक्रमक ; खासगी बसकडून दाेनवेळा जबरदस्तीने टोल वसुली
Follow Us
Close
Follow Us:
पाचगणी : शिवसेनेचे वाहतूक सेनेचे पदाधिकारी विक्रांत गावडे यांच्या स्वतःच्या खासगी बसकडून आनेवडी टोल नाक्यावर जबरदस्तीने दोन वेळा टोल वसुली करण्यात आली. गाडीमध्ये प्रवाशी असल्याने वाहन चालक यांनी वाद न घालता फास्टट्याग मधून पैसे कट करून घेण्यास सांगितले. त्यामध्ये बॅलन्स असताना देखील  तुमच्या खात्यावर कमी शिल्लक आहे, असे सांगून, कमीत कमी ५०० शिल्लक  असणे गरजेचे आह, अशी बतावणी केली गेली आणि जबरदस्तीने बस माघारी घेण्यास सांगितले. शेवटी या गुंडागर्दीला कंटाळून चालकाने रांगेतून बस मागे घेतली. यामध्ये जवळ जवळ १/२ तास वाया गेला. शेवटी गाडी जवळ येऊन मुजोर टोल कर्मचाऱ्याने फास्टट्याग नसल्याने दुप्पट टोल म्हणून ५२० मागितले. कॅश नसल्याने गूगल पे करावयास सांगितले. ते ही त्याच्या स्वतःच्या अकाउंटवर. नंतर त्याची पावती न देता गाडी घेऊन जाण्यास सांगितले. बस थोडे अंतर पुढे गेल्यावर मुळ टोल देखील कट झाल्याचे लक्षात आले. म्हणजे दुहेरी फसवणूक झाली होती. ही बाब वाहन चालकाने विक्रांत गावडे यांना सांगितली. घडल्या प्रकारची माहिती घेण्यासाठी संबंधित व्यक्तीला गुगल पे च्या नंबरवर कॉल करून विचारले असता तो गावडे यानाच उलट सुलट बोलून शिवीगाळ करू लागला. ही बाब जावली तालुका प्रमुख नितीन गोळे यांना समजल्यावर त्यांनी या संबंिधत जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांना याबाबत माहिती दिली.

कर्मचाऱ्याची उर्मट भाषा
मोहिते यांनी संबंधिताला फोनवर विचारणा केली असता त्याने उर्मट भाषा वापरली. त्यामुळे मोहिते यांच्यासह  जावली तालुका प्रमुख नितीन गोळे, वाहतूक सेना विक्रांत गावडे, सातारा शहर प्रमुख शिवराज टोणपे, शहर संघटक प्रणव सावंत, युवा सेना सागर धोत्रे, आकाश पवार, रवी पार्टे, रवी गोळे, प्रकाश गोळे, बापू दुर्गवळे, ज्ञानेश्वर शेलार, जीवन शिंदे, अमोल गोळे, मनोज गावडे, सागर गुजर, शुभम तरडे, गणेश गोळे, प्रवीण पवार, बापू गावडे व शिवसैनिक यांनी टोल नाका गाठला आणि टोल नाक्यावर एकच गोंधळ उडाला.

प्रश्नांना उत्तर देताना नाकीनऊ
टोल प्रशासनाला प्रश्नाच्या भडिमारला उत्तर देता देता नाकी नऊ आले. शेवट शिवसैनिक आक्रमक होत आहेत हे पाहिल्यावर पोलिस प्रशासन त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी मध्यस्ती करत आरोपीला स्वतः पोलिस स्टेशनला घेऊन आले.

व्यवस्थापकांना खडे बोल सुनावले
शिवसैनिकांचा मोर्चा टोल नाक्यावरील भुईंज पोलिस स्टेशनला वळला. एपीआय कांबळे भेटून सविस्तर सर्व प्रकरण सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्वरित संबधित कर्मचारी याच्यावर गुन्हा दाखल करावयास सांगितला. सर्व शिवसैनिक यांच्यासमोर टोल प्रशासन व्यवस्थापकांना खडे बोल सुनावले. कडक सूचना दिल्या गेल्यानंतर गुन्हा दाखल झाला.

Web Title: Shiv sena aggressive over toll booth arbitrariness nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2022 | 06:34 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pachgani
  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
2

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
3

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
4

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.