Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deepak Kesarkar : “निवडणूक आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो…”, दीपक केसरकर यांची उबाठावर टीका

सत्तेसाठी जेव्हा उबाठाने काँग्रेससोबत युती केली तेव्हा त्यांनी सावरकरांच्या विचारांना तिलांजली दिली, अशी खरमरीत टीका केसरकर यांनी केली. पूर्वी मुंबईतील खड्ड्यांवरुन गाणी बनायची मात्र आता त्याची आवश्यकत नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 07, 2026 | 06:50 PM
"निवडणूक आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो...", दीपक केसरकर यांची उबाठावर टीका

"निवडणूक आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो...", दीपक केसरकर यांची उबाठावर टीका

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूक आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो
  • दीपक केसरकर यांची उबाठावर टीका
  • विकासाच्या मुद्द्यावर मुंबईकर महायुतीच्या पाठीशी
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहीले आहेत. अशातच शिंदे गटातील दीपक केसरकर यांनी उबाठावर टिका केली आहे. निवडणूक आली की मराठी माणसाची आठवण होते. २५ वर्ष सत्तेत असताना काम केले नाही आणि आता भावनिक मुद्द्यावर सत्ता आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका शिवसेना आमदार व प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उबाठावर केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मागील अडीच वर्षात मुंबईतील पायाभूत सुविधांचा विकास, मराठी माणसाला दिलेला न्याय आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमुळे यंदा मुंबईकर महायुतीच्या पाठिशी उभा राहील, असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. सावरकरांचे विचार आणि सावरकरांवर सर्वाधिक टीका राहुल गांधी यांनी केली होती. सत्तेसाठी जेव्हा उबाठाने काँग्रेससोबत युती केली तेव्हा त्यांनी सावरकरांच्या विचारांना तिलांजली दिली, अशी खरमरीत टीका केसरकर यांनी केली. पूर्वी मुंबईतील खड्ड्यांवरुन गाणी बनायची मात्र आता त्याची आवश्यकत नाही. मुंबई लवकरच खड्डेमुक्त होईल, असे केसरकर म्हणाले.

आठ वर्षांनी अवतरले राजकीय नेते! समस्यांच्या याद्या वाचून मतदारांनी जागेवरच टोकले

केसरकर पुढे म्हणाले की, अंबरनाथ नगर परिषदेच्या निकालानंतर सर्वाधिक २७ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने युतीचा प्रस्ताव भाजपला पाठवला होता, तो जर स्वीकारला असता तर तिथे महायुतीची सत्ता आली असती, मात्र भाजपने शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवून काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला, तो का घेतला याचे आत्मपरिक्षण करायला हवे. शिवसेना २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष असून देखील सत्तेबाहेर आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत जाण्याचा भाजपने निर्णय का घेतला, त्यावर तेच उत्तर देऊ शकतात, असे केसरकर म्हणाले. मात्र महाराष्ट्रात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती मजबूत आहे आणि मुंबईतही महायुतीचा विजय होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. शिवसेना युती धर्माचे पालन १०० टक्के करत आलोय आणि भविष्यात करु, असे केसरकर म्हणाले.

शिवसेना, भाजप आणि महायुतीने ज्यांच्याविरोधात निवडणुका लढल्या त्यांच्यासोबत केवळ सत्तेच्या लालसेपोटी स्थानिक पातळीवर काही नेत्यांनी काँग्रेससोबत युती केली असेल तर ते योग्य नाही. यावर भाजपच्या वरिष्ठांनी कारवाई करायला हवी, अशी मागणी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी खासदार डॉ. शिंदे यांनी शहरात दोन रोड शो केले.

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा

Web Title: Deepak kesarakar on ubt they remember the marathi person only when elections come

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • shivsena

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana : निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर यांचा दावा
1

Ladki Bahin Yojana : निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर यांचा दावा

BMC Election 2026: प्रचारासाठी अवघे सात दिवस, नेत्यांच्या प्रचारसभानंतर वातावरण बदलणार
2

BMC Election 2026: प्रचारासाठी अवघे सात दिवस, नेत्यांच्या प्रचारसभानंतर वातावरण बदलणार

भाजप–शिवसेना शिंदे गटातील संघर्ष तीव्र, “कलंकित आमदार…” प्रताप सरनाईकांचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप
3

भाजप–शिवसेना शिंदे गटातील संघर्ष तीव्र, “कलंकित आमदार…” प्रताप सरनाईकांचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप

Hingoli Zilla Parishad Election: उमेदवाराचा पराभव करा अन ७१ लाख जिंका…; संतोष बांगरांचे ओपन चॅलेंज
4

Hingoli Zilla Parishad Election: उमेदवाराचा पराभव करा अन ७१ लाख जिंका…; संतोष बांगरांचे ओपन चॅलेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.