Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धारावी प्रकल्पाला विरोध अन् उद्धव ठाकरेंना शिवसेनेने व्यंगचित्रातून दाखवला आरसा! सोशल मीडियावर वादळ…

देशात प्रथमच एखाद्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना घरे देण्याचा निर्णय धारावीचे पुनर्वसन करताना राज्य सरकारने घेतला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 09, 2025 | 09:55 PM
धारावी प्रकल्पाला विरोध अन् उद्धव ठाकरेंना शिवसेनेने व्यंगचित्रातून दाखवला आरसा! सोशल मीडियावर वादळ...

धारावी प्रकल्पाला विरोध अन् उद्धव ठाकरेंना शिवसेनेने व्यंगचित्रातून दाखवला आरसा! सोशल मीडियावर वादळ...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करून धारावी बचाव आंदोलनाची हाक देणाऱ्या उबाठा गटाला शिवसेनेने व्यंगचित्र काढून फटकारले आहे. शिवसेनेकडून हे व्यंगचित्र त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसिद्ध करण्यात आले असून सध्या ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यामुळे उबाठा गटाच्या आजच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पविरोधी आंदोलनापूर्वीच शिवसेनेने त्यांच्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट होत आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी तेथील रहिवाशांच्या घरांची नोंदणी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. देशात प्रथमच एखाद्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना घरे देण्याचा निर्णय धारावीचे पुनर्वसन करताना राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अपात्र झोपडीधराकांना सुद्धा हक्काची घरे मिळणार आहेत. तसेच पात्र, लाभार्थ्यांना ३५० चौरस फुटांची घरे देखील मुंबईत मिळणार आहेत. मात्र, याला थेट विरोध करण्याची भूमिका उबाठा गटाने घेत धारावी बचाव नावाने आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रत्यक्ष धारावीतील सामान्य झोपडपट्टीधारक देखील विरोध करत आहेत. कारण, या झोपडपट्टी धारकांना हक्काचे व स्वतःच्या नावावर असलेले घर हवे आहे. म्हणूनच, ९० टक्क्यांहून अधिक धारावीकरांनी धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी राबवण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रियेत सहभाग घेतला.

मुंबई महानगरातील सर्वात…धारावी पुनर्विकासाबाबत एकनाथ शिंदेंचे महत्वाचे विधान

मात्र, उबाठा गट याला विरोध करू पाहत असल्याने धारावीकर नाराज झाले आहेत. अशा या धारावीकरांना हक्काचे घर मिळू नये यासाठी प्रयत्नशील असलेल्या उबाठा गटाला शिवसेनेने व्यंगचित्रातून फटकारले आहे. धारावी बचाव आंदोलनाच्या फलकास एका सामान्य धारावीकराला स्वतः उद्धव ठाकरे बांधत असल्याचे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. तसेच, तो हतबल धारावीकर समोर पडलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पातील घराच्या चावीकडे बोट दाखवत असल्याचे दृश्यंही यात दाखवले गेले आहे. सध्या हे व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेक जण सोशल मीडियावर या व्यंगचित्राचा आधार घेऊन व्यक्त होत आहेत.

धारावी पुनर्विकासाबाबत एकनाथ शिंदेंचे महत्वाचे विधान

धारावीचा चेहरा बदलण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, लवकरच धारावी हे आशियातील सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. झोपडपट्टीची ओळख पुसून टाकत, धारावी आता सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरणाचे प्रतीक ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी संवाद साधत होते.

Web Title: Shiv sena criticizes uddhav thackeray for opposing dharavi project by drawing cartoons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • Mumbai News
  • shivsena
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
1

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
2

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
3

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात
4

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.