Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दादा भुसे यांची जहरी टीका; म्हणाले, “दावोस दौरा ऐकून विरोधकांच्या पोटात आता गोळा उठला…”

शिवसेना (शिंदे गट) नेते दादा भुसे यांनी ठाकरे गटावर (Thackeray group) जोरदार निशाणा साधला आहे. दावोस दौऱ्यावरुन टीका करणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. 'दावोस दौरा ऐकून विरोधकांच्या पोटात आता गोळा उठला आहे' अशी खोचक टीका दादा भुसे यांनी केली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 16, 2024 | 06:15 PM
दादा भुसे यांची जहरी टीका; म्हणाले, “दावोस दौरा ऐकून विरोधकांच्या पोटात आता गोळा उठला…”
Follow Us
Follow Us:

नाशिक – शिवसेना (शिंदे गट) नेते दादा भुसे (Dada Bhuse) यांनी ठाकरे गटावर (Thackeray group) जोरदार निशाणा साधला आहे. नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना मंत्री भुसे यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच दावोस दौऱ्यावरुन (Davos tour) टीका करणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. ‘दावोस दौरा ऐकून विरोधकांच्या पोटात आता गोळा उठला आहे’ अशी खोचक टीका दादा भुसे यांनी केली.

राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रतेचा निर्णयाची चिरफाड करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महापत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना दादा भुसे म्हणाले, “जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांचे रोज केविलवाणे प्रयत्न सुरू असतात. अध्यक्षांनी जो न्यायनिवाडा केला, त्यात कायदे आणि नियम वस्तुस्थिती यावर न्यायनिवाडा केला. कदाचित न्यायनिवाडा याला दोन बाजू असू शकतात. ज्याला मान्य नाही, त्याला दाद मागण्याचा अधिकार आहे. परंतु जनतेत संभ्रम करणे आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. तुम्ही उद्या सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणार का? याअगोदर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, हे उचित नाही.” अशी टीका दादा भुसे यांनी ठाकरे गटावर केली.

विरोधकांच्या पोटात आता गोळा उठला आहे – दादा भुसे

दावोस दौऱ्यावरुन राजकारण रंगले असताना दादा भुसे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. “विरोधकांच्या पोटात आता गोळा उठला आहे. महाराष्ट्रात विकास कामांचे जे प्रकल्प आहे, ते बघून जागतिक पातळीवरील गुंतवणूक होईल. तिथून आल्यानंतर किती हजारो कोटींचे करार संपन्न झाले, याची माहिती मुख्यमंत्री देतील. त्याअगोदरच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. आपल्या राज्याचे नाव कमी होईल, यासाठी हे लोक खालच्या पातळीवर आले आहे.” असा घणाघात दादा भुसे यांनी विरोधकांवर केला.

Web Title: Shiv sena dada bhuse targeted opponents thackeray group who criticized davos visit nashik nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2024 | 06:15 PM

Topics:  

  • Poliical News
  • Rahul Narwekar
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ
1

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ

‘उद्धव ठाकरेंना जळी स्थळी काष्ठी पाषाणी शिंदेच दिसतात’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला
2

‘उद्धव ठाकरेंना जळी स्थळी काष्ठी पाषाणी शिंदेच दिसतात’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

‘Gen Z शी बोलण्याआधी अमित शाहांचा राजीनामा घ्या’; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना खोचक टोला
3

‘Gen Z शी बोलण्याआधी अमित शाहांचा राजीनामा घ्या’; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना खोचक टोला

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला
4

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.