Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमान उड्डाण रद्द होण्याच्या प्रमाणात वाढ, प्रवाशांना मनस्ताप; खासदार बारणेंची केंद्र सरकारकडे मोठी मागणी

विमान उड्डाण रद्द होण्याचे प्रमाण वाढले असून, यात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 05, 2025 | 11:41 AM
विमान उड्डाण रद्द होण्याच्या प्रमाणात वाढ, प्रवाशांना मनस्ताप; खासदार बारणेंची केंद्र सरकारकडे मोठी मागणी

विमान उड्डाण रद्द होण्याच्या प्रमाणात वाढ, प्रवाशांना मनस्ताप; खासदार बारणेंची केंद्र सरकारकडे मोठी मागणी

Follow Us
Follow Us:
  • विमान उड्डाण रद्द होण्याच्या प्रमाणात वाढ
  • खासदार बारणेंची केंद्र सरकारकडे मोठी मागणी
  • केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांना दिले निवेदन
पिंपरी : देशातील विमान वाहतूक क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या गंभीर अव्यवस्थेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विमान उड्डाण रद्द होण्याचे प्रमाण वाढले असून, विमानांची उड्डाणे १५ ते २० तासांनी होत आहेत, यात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या अव्यवस्थेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत केंद्रीय उड्डानमंत्री राम मोहन नायडू यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, इंडिगोच्या मोठ्या प्रमाणावर विलंबित आणि रद्द झालेल्या उड्डाणांमुळे लाखो प्रवासी अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसह देशाच्या विमान वाहतूक व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मागील आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी इंडिगोच्या उड्डाणांमध्ये अभूतपूर्व गोंधळ उडाला. कंपनीचा ‘ऑन टाइम परफॉर्मन्स’ ३५ टक्क्यांवर घसरला. सुमारे २,२०० उड्डाणांपैकी तब्बल १,४०० उड्डाणे विलंबित झाली, तर २०० पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली. या अव्यवस्थेचा परिणाम इतर विमान कंपन्यांवरही झाला असून, पुणे विमानतळावरही अनेक उड्डाणे अचानक रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

विमान वाहतूक क्षेत्रातील कार्यप्रणाली आणि समन्वय यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या अव्यवस्थेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या परिस्थितीत कोणताही सायबर हल्ला, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित अडथळा कारणीभूत आहे का, याची सखोल तपासणी व्हावी, तसेच सर्व एअरलाईन्स आणि विमानतळ प्राधिकरणांमधील समन्वय प्रणाली मजबूत करण्यात यावी, अशी मागणीही खासदार बारणे यांनी केली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेस आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून देशातील फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल्सची संख्या आणि गुणवत्ता वाढविणे, पायलट व तांत्रिक प्रशिक्षणासाठी युवकांना प्रोत्साहन देणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत विमानतळ व एअरलाईन्स यांच्यातील समन्वय अधिक बळकट करणे यांसारख्या सूचना देखील त्यांनी सरकारसमोर मांडल्या आहेत. भारताची विमान वाहतूक प्रणाली ही राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीशी निगडित आहे. तिची सुरक्षितता, विश्वसनीय आणि अखंड कार्यप्रणाली राखणे ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असून, या प्रकरणात तात्काळ आणि ठोस कारवाई होणे आवश्यक आहे, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Shiv sena mp shrirang barne has made a big demand from the central government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • pune news
  • Shrirang Barne

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.