
ShivSena Thackeray group criticizes Nitesh Rane's Eid statement on Nashik Tapovan
नाशिकमधील कुंभमेळाच्या तपोवनासाठी 1800 झाडे कापली जाणार आहेत. याविरोधात अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला खडेबोल सुनावले. मात्र या प्रकरणावर प्रतिक्रिया देत मंत्री नितेश राणेंनी ईदचा विषय काढला. मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, तपोवन मधल्या वृक्ष थोड ची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच..ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत..तेव्हा गप्प का ? सर्व धर्म सम भाव ? असा सवाल करत मंत्री नितेश राणे यांनी नाशिकच्या वादामध्ये उडी घेतली.
हे देखील वाचा : रुपया एवढा का घसरतोय…मला माहिती; रुपयाने 90 पार केल्यानंतर PM मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल
यावरुन मात्र तपोवनाच्या वादाला नवीन वळण लागले. यामुळे आता ठाकरे गटाने मंत्री नितेश राणेंवर आगपाखड केली. त्यांच्यावर जहरी टीका करत राणे यांच्या भूमिकेवर निशाणा साधला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक ट्वीट केले आहे. अखिल चित्रे यांनी या मुद्द्यावर ट्वीट करत वृक्षतोडीचा विषय धर्माचा नसून पर्यावरणाचा असल्याचे स्पष्ट मत मांडले आहे. वृक्षतोड हा पर्यावरणाचा विषय आहे धर्माचा नाही. टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्याला वृक्षतोडसारखा गंभीर विषय कुठून समजणार? टिल्लू-लेव्हल बुद्धीत वृक्षतोड बसणार तरी कुठे? त्याच्या सिस्टीममध्ये तर हिंदू-मुस्लीम बकरा-कोंबडीच फिरतात, वृक्षतोडची फाईल तर ‘unsupported format’ म्हणूनच उघडत नाही, अशा शब्दात अखिल चित्रे यांनी सडकून टीका केली आहे.
हे देखील वाचा : ‘ईदच्या वेळी बकरी कापण्याला…’; तपोवन वृक्षतोडीच्या प्रकरणावर नितेश राणेंचे वादग्रस्त विधान
सयाजी शिंदेंनी काढले सरकारचे वाभाडे
या प्रकरणावर सयाजी शिंदे म्हणाले की, “मी जागरूक नाशिककरांना पाठिंबा द्यायला गेलो होते. जिथे झाडं तुटतील तिथे आपण उभं राहिलं पाहिजे. उजाड माळरानाच्या ठिकाणी आम्ही झाडं लावणार. तिथे झाडं नाहीत, कारण तिथली माती चांगली नाही. तिथे कुंभ मेळा भरवला पाहिजे. निवडून दिलं म्हणजे म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असं नाही. सर्वसामान्य माणसाचा विचार केला पाहिजे. मोठी झाडं तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचं, अस कुठे होतं का,” अशा शब्दांत सयाजी शिंदे यांनी सवाल उपस्थित केला.