Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यात ‘हिंदुस्थान जिंदाबाद’ घोषणा देत शिवसेना ठाकरे गटाकडून तिरंगा सन्मान यात्रेचे आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर राज्यात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. नुकतेच ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तिरंगा सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 18, 2025 | 10:01 PM
ठाण्यात तिरंगा सन्मान यात्रेचे आयोजन

ठाण्यात तिरंगा सन्मान यात्रेचे आयोजन

Follow Us
Close
Follow Us:

22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केलीत. याच ऑपरेशन सिंदूरनंतर आता राज्यात वेगवेगळ्या शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ठाण्यात तिरंगा सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

काश्मीरमधील पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरून भारतीय सैन्याने पराक्रम करून दाखवला आहे. या युद्धात भारतीय सैन्याचा सिंहाचा वाटा असल्याने सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ठाणे शहरात तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली. यावेळी ‘हिंदुस्थान जिंदाबाद’…’वंदे मातरम’… ‘भारत माता की जय’ या घोषणेने संपूर्ण ठाणे दुमदुमून गेले.

मुंबईतील दोन तरुणांचा भूतीवली धरणात बुडून मृत्यू; Dam मध्ये १०० पेक्षा अधिक मृत्यूंची नोंद

शिवसेना (ठाकरे गट) नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यसह अनेक शिवसैनिक बाईक रॅलीत सहभागी झाले होते. गेल्या आठवड्यात भारतीय वीर जवानांनी दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला. या पराक्रमाची देशभर कौतुक केले जात असून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेल्या जवानांवर सर्वत्र कौतुक केले जात आहे. यापुढे दहशतवाद्यांनी तोंड वर काढले तर त्यांची नांगी ठेचू असा इशारा देणाऱ्या जवानांच्या पाठीमागे शिवसेना परिवार सदैव उभा राहील असा विश्वास यावेळी राजन विचारे यांनी दिला. दरम्यान, हिंदुस्थानी सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा सन्मान यात्रेत शेकडो देशभक्त हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या.

Solapur Fire : सोलापुरात टॉवेल कारखान्यात अग्नितांडव; सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह ८ जणांचा होरपळून मृत्यू

यात्रेमुळे शहरात देशभक्त वातावरण

या यात्रेची सुरवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्त्तीस्थळपासून झाली. त्यानंतर पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जांभळीनाका, भंडार आळी, सिडको बस स्टॉप, अष्टविनायक चौक, दौलतनगर, कोपरी ब्रीज, ज्ञानसाधना कॉलेज, मेंटल हॉस्पिटल, वागळे चेक नाका, रोड नं. १६ चौक, किसन नगर, वागळे सर्कल, लोकमान्य नगर डेपो, वर्तकनगर, वसंत विहार, मानपाडा, आनंद नगर, विजय नगरी, हिरानंदानी इस्टेट, मनोरमा नगर, ढोकाळी, हायलॅण्ड, बाळकुम, गोल्डन डाईज नाका, वृंदावन, श्रीरंग, राबोडी, उथळसर मार्गे टेंभी नाका, चरई, राम मारुती रोड, गोखले रोड, नौपाडा, हरिनिवास, पांचपाखाडी, महानगरपालिका, चंदनवाडीमार्गी शहीद उद्यान जवळ यात्रेची सांगता करण्यात आली. जवळपास तीन तास चाललेल्या या तिरंगा सन्मान यात्रेत ठाण्यात देशभक्त वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: Shiv sena thackeray group organizes tiranga samman yatra in thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 10:01 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Shivsena UBT
  • Thane news

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! एकनाथ शिंदेनी फिरवला गेम; ‘या’ बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश
1

मोठी बातमी! मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! एकनाथ शिंदेनी फिरवला गेम; ‘या’ बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश

Thane :  निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली
2

Thane : निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Mumbai Political News: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ‘या’ उपविभाग प्रमुखाने हाती घेतले ‘कमळ’
3

Mumbai Political News: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ‘या’ उपविभाग प्रमुखाने हाती घेतले ‘कमळ’

Thane Accident Case : गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी
4

Thane Accident Case : गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.