सोलापुरात टॉवेल कारखान्यात अग्नितांडव; सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह ८ जणांचा होरपळून मृत्यू
सोलापुरात आज एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. अक्क्लकोटच्या एमआयडीसी रोडमधील सेंट्रल कारखान्यात रविवारी सकाळी भीषण आग लागली होती. यात कारखान्यातील ८ कामगारांचा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सुरुवातीला तिघांचा मृत्यू झाल्यांचं सांगण्यात येत होतं. शिवाय सहा महिन्याच्या बाळासह एक कुटुंब कारखान्यात अडकून पडलं होतं. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू होते. दरम्यान या आगीतील मृतांचा आकडा आता ८ वर पोहोचला आहे.
Hyderabad Fire : हैदराबादमध्ये चारमीनार परिसरात भीषण आग; १७ जणांचा होरपळून मृत्यू
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल इंडस्ट्रीजचे मालक देखील कारखान्यात अडकले होते. तर ५ जण मास्टर बेडरुममध्ये लपून बसले होते. या पाच जणांना कारखान्याच्या बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे त्यांचा गुदमरून आणि होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. मृतदेह बाहेर काढल्यानंतर विच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये ५ पुरुष, २ महिला आणि एका सहा महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश आहे.
यंदा समुद्राला येणार 18 दिवस मोठी भरती; जाणून घ्या काय सांगतो हवामानाचा अंदाज?
दरम्यान या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात महापालिकेची यंत्रणा कूचकामी ठरल्याचा आरोप करण्यात आहे आग अटोक्यात आणण्यासाठीळी पाणी कमी पडत होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून खासगी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे नागरिकांमधून सताप व्यक्त होत आहे.
कारखान्यात पहाटे पहाटे तीनच्या सुमारास आग लागली होती. या कारखान्यात टॉवेल तयार होते. त्यामुळेचं कमी वेळात आगीने रौद्ररुप धारण केलं. बघता बघता आग संपूर्ण कारखान्यात पसरली. घटनेची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या सर्व गाड्या, अक्कलकोट पंढरपूर चिंचवड एमआयडीसी एनटीपीसी या ठिकाणावरून पाण्याचे बंब मागवण्यात आले. कारखान्यामध्ये साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आतमध्ये प्रवेश करता येत नव्हता. आग आटोक्यात आणण्यासात अडचणी येत होत्या. तरीही अग्नीशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.
सुरुवातीला तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. शिवाय सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक ७८ वर्षीय उस्मानभाई मन्सूरी, २३ वर्षीय शिफा मन्सूरी, २४ वर्षीय अनस मन्सूरी आणि ६ महिन्यांचा मुलगा युसूफ मन्सूरी कारखान्यात अडकून पडले होते. तर आणखी ५ जण मास्टर बेडरुममध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. पण त्यांना बाहेर पडता आलं नाही. त्यांचा होरपळून मृत्यू झाला.