Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: आमदार खताळांची तलाठी कार्यालयावर ‘धडक’ कारवाई; एका मेसेजवर उघड केला ‘एजंटगिरी’चा कारभार!

संगमनेरमध्ये चावडी येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. या घटनेची गंभीर दाखल घेत आमदार खताळ यांनी तलाठी कार्यालयात धाड टाकून 'एजंट गिरी'चा पर्दाफाश केला.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 16, 2026 | 08:48 PM
आमदार खताळांची तलाठी कार्यालयावर 'धडक' कारवाई; एका मेसेजवर उघड केला 'एजंटगिरी'चा कारभार!

आमदार खताळांची तलाठी कार्यालयावर 'धडक' कारवाई; एका मेसेजवर उघड केला 'एजंटगिरी'चा कारभार!

Follow Us
Follow Us:

संगमनेर शहरातील चावडी येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकां कडून पैसे उकळले जात असल्याचा प्रकार समोर आला. संबंधित महिलेने आमदार अमोल खताळ यांना मोबाईलवर संदेश केला असता या गंभीर बाबीची आमदार खताळ यांनी दखल घेत प्रत्यक्ष जाऊन धाड टाकत चावडी तलाठी कार्यालयात सुरू असणाऱ्या ‘एजंट गिरी’चा पर्दाफाश केला.

प्रांताधिकारी व तहसीलदार यांना कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या. संगमनेर शहरातील अशोक चौकातील चावडी तलाठी कार्यालयामध्ये दिव्यांग व मयोवृद्धांना दाखले व इतर कामासाठी वारंवार हेलपाटे मारायला लावून त्यांची अडवणूक करत पैसे मागितले जातात अशी तक्रार एका महिलेने आमदार खताळ यांना मोबाईल वरून संदेश पाठवत केली. विशेष म्हणजे, या कामकाजामध्ये एका खाजगी व्यक्तींचा सहभाग आहे असा आरोपही करण्यात आला. या तक्रारीची गंभीर दखल घेत आमदार खताळ यांनी तत्काळ चावडी तलाठी कार्यालयात धाव घेत धाड टाकली. मात्र, त्या कार्यालयात तलाठी व कोतवाल कोणीच हजर नव्हते. त्या ऐवजी मन्सूर शेख हा व्यक्ती तेथे बसून शासकीय कागदपत्रे हाताळत असल्याचे आमदार खताळ यांच्या निदर्शनास आले.

आता प्रवास करतानाही होणार कमाई! Flipkart आणि Uber ची ऐतिहासिक भागीदारी, राइड्सवर मिळणार ‘सुपरकॉइन्स’

या गंभीर प्रकारानंतर आमदार खताळ यांनी प्रांताधिकारी अरुण उंडे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांना फोन करून संबंधित कामगार तलाठ्यावर आणि कार्यालयात आढळून आलेल्या एजंटांवर कठोर कारवाई करा अशा सक्त सूचना देत शासकीय कागद पत्रांची पडताळणी खाजगी व्यक्तीं मार्फत होणे हा अत्यंत गंभीर आणि बेकायदेशीर प्रकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तलाठी नसल्याने आम्हीच काम पाहातो

यावेळी आतमध्ये उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीला विचारणा केली असता, “मी मन्सूर शेख यांचा जावई आहे,” असे उत्तर देण्यात आले. यावर आमदार खताळ यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, तुम्हाला येथे बसण्याचा कोणी अधिकार दिला? असा संतप्त सवाल उपस्थित करत जाब विचारला. त्यावर “तलाठी उपस्थित नसल्याने आम्हीच काम पाहत होतो,” असे उत्तर त्या व्यक्तीने आमदार खताळ यांना दिले.

खताळांची तलाठी कार्यालयावर धाड

आमदार अमोल खताळ यांनी चावडी तलाठी कार्यालयावर धाड टाकली असल्याची माहिती मिळतात महसूल प्रशासन खडबडून जागे झाले प्रांत अधिकारी आणि तहसीलदार अहिल्यानगर येथे मीटिंगसाठी गेले होते त्यांनी नायब तहसीलदार भांगरे यांना घटनास्थळी पाठवले, त्यानंतर संबंधित दोघांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना यापुढे चावडी तलाठी कार्यालयात बसू न देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Love Jihad नंतर आता Lenskart मध्ये टिकली-टिळा लावण्यावर बंदी, ड्रेस कोड वादावर CEO ने दिले स्पष्टीकरण

एका मेसेजवर ‘ॲक्शन’

सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींची जाण ठेवणारे आमदार अमोल खताळ यानी पुन्हा एकदा आपल्या संवेदन शीलतेची प्रचिती दिली. एका महिलेने केलेल्या साध्या मोबाईल मेसेजची त्यांनी केवळ दखलच घेतली नाही, तर त्या मागील वेदना ओळखत तात्काळ प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेतली. कोणताही वेळ न दवडता त्यांनी थेट तलाठी कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई केली.

Web Title: Sangamner talathi office raid amol khatal exposes agent malpractice revenue irregularities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • Sangamner

संबंधित बातम्या

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली
1

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन
2

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात
3

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात

Raghav Chadha SIR: राघव चड्ढांचे नाव कटल्यावर संदीप दीक्षित भडकले; BJP अन् AAP वर जोरदार हल्ला!
4

Raghav Chadha SIR: राघव चड्ढांचे नाव कटल्यावर संदीप दीक्षित भडकले; BJP अन् AAP वर जोरदार हल्ला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.