Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांच्या भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालीत मंत्रिमंडळातील ३९ मंत्र्यांनी नुकताच मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 17, 2024 | 04:05 PM
उद्धव ठाकरेंनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांच्या भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उद्धव ठाकरेंनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांच्या भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Follow Us
Close
Follow Us:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालीत मंत्रिमंडळातील ३९ मंत्र्यांनी नुकताच मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंळातील काही ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आल्यामुळे नाराजीचा सूर आहे. ही नाराजी दूर होत नाही तोच उद्धव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाच्या बाजूने २६९ मतदान; विधेयक नक्की पास होणार का?

नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली, मात्र नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही. विधानसभा विरोधी पक्षनेत्यासंदर्भांत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणीस यांना शुभेच्छा देखील दिल्याची माहिती आहे.

जॉर्जियात ११ भारतीयांचा मृत्यू; एकाच रूममध्ये सापडले मृतदेह, मृत्यूचं मोठं कारण आलं समोर

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर, ही दोघांमधली पहिलीच भेट ठरली आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे देखील आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ही दुसरी अचानक झालेली भेट आहे. याआधी विधान परिषद निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानसभेत एकाच लिफ्टमध्ये गाठभेट झाली होती. त्यावेळीही राज्यात चर्चांना उधाण आलं होतं.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला न भुतो न भविष्यती विजय मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबई येथे पार पडला. या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून निमंत्रण दिले होते. मात्र विरोधकांमधून कोणताही नेता या सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. मात्र उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील अनेक नेते शपथविधीला हजर राहिले नाहीत. यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई आणि सचिन अहिर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

उद्धव ठाकरे म्हणाले..

मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भेटीबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जाती, अशी महायुती सरकारकडून अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त ही निवडणूक कशी जिंकली हे प्रश्न आहेतच. त्याबाबत यापुढे जनतेत जाऊन आवाज उठवू.”

Web Title: Shiv sena ubt leader uddhav thackeray meet cm devendra fadanavis high political drama in maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 03:32 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Shiv Sena UBT
  • Shiv Sena UBT Chief Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
1

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
2

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा
3

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;
4

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.