Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसैनिकांचा उदय सामंतांकडे जोरदार आग्रह; ‘या’ नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले असून, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनाच महायुतीची उमेदवारी द्यावी, अशी ठाम मागणी उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 30, 2026 | 03:56 PM
शिवसैनिकांचा उदय सामंतांकडे जोरदार आग्रह; 'या' नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी

शिवसैनिकांचा उदय सामंतांकडे जोरदार आग्रह; 'या' नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी

Follow Us
Follow Us:

चिपळूण : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले असून, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनाच महायुतीची उमेदवारी द्यावी, अशी ठाम आणि एकमुखी मागणी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. यासाठी चिपळूणमधील असंख्य शिवसैनिक, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पाली येथे जाऊन सामंत यांची भेट घेतली.

 

महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या उमेदवाराबाबत चर्चांना वेग आला आहे. अशा परिस्थितीत चिपळूणमधील शिवसैनिकांनी सदानंद चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी आमदार किरण सामंत, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. सदानंद चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी शिवसैनिकांमध्ये असलेला उत्साह आणि पाठिंबा अधोरेखित झाला आहे. या भेटीत विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

ताकद वाढविण्यासाठी सातत्याने परिश्रम

कार्यकर्त्यांनी सांगितले की, आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना सोडल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष संघटना उभी करण्याचे आणि मजबूत करण्याचे मोठे काम सदानंद चव्हाण यांनी केले. चिपळूणसह संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवसंजीवनी मिळाली आणि ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. मागील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी तगडी लढत देत अत्यल्प मतांच्या फरकाने पराभव स्वीकारला.

हे सुद्धा वाचा : विविध मागण्यांसाठी RTO कर्मचारी जाणार बेमुदत संपावर; आधी 2 जूनला निदर्शने करणार अन् नंतर…

संघटना वाढविण्यासाठी योगदान

पक्षासाठी आयुष्यभर निष्ठेने काम करणाऱ्या आणि संघटना वाढविण्यासाठी योगदान देणाऱ्या सदानंद चव्हाण यांनाच विधान परिषदेची संधी मिळाली पाहिजे, अशी भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली.

हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय; पार्थ पवारांच्या हस्तक्षेपावर छगन भुजबळ का भडकले?

Web Title: Shiv sena workers have demanded that sadanand chavan be given a nomination for the legislative council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • MLC Election
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Ektnath Shinde: अमरावतीत उद्या राजकीय रणधुमाळी! एकनाथ शिंदेंच्या सभेत कोणता मुद्दा गाजणार?
1

Ektnath Shinde: अमरावतीत उद्या राजकीय रणधुमाळी! एकनाथ शिंदेंच्या सभेत कोणता मुद्दा गाजणार?

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
2

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ratnagiri: हापूस आंब्याला मिळणार नवी ओळख! निवेंडी मॅंगो पार्कसाठी भूसंपादन वेगात
3

Ratnagiri: हापूस आंब्याला मिळणार नवी ओळख! निवेंडी मॅंगो पार्कसाठी भूसंपादन वेगात

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
4

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.