Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवली हादरली! डॉक्टर मारहाण प्रकरण ताजे असतानाच शिंदे सेनेचे २ मोठे नेते अटकेत; १५ लाखांचा गंडा घातल्याचा आरोप

डोंबिवलीतील सागाव येथील बेकायदा इमारत प्रकरणात खोटे दस्तऐवज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख रामचंद्र माने आणि लक्ष्मण मिसाळ यांच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 15, 2026 | 09:49 PM
डोंबिवली हादरली! डॉक्टर मारहाण प्रकरण ताजे असतानाच शिंदे सेनेचे २ मोठे नेते अटकेत (Photo credit- X)

डोंबिवली हादरली! डॉक्टर मारहाण प्रकरण ताजे असतानाच शिंदे सेनेचे २ मोठे नेते अटकेत (Photo credit- X)

Follow Us
Follow Us:
  • डोंबिवली हादरली!
  • डॉक्टर मारहाण प्रकरण ताजे असतानाच शिंदे सेनेचे २ मोठे नेते अटकेत
  • १५ लाखांचा गंडा घातल्याचा आरोप
डोंबिवली: डोंबिवलीमध्ये शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकाकडून डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचे प्रकरण ताजे असतानाच, आता शिंदे सेनेच्या दोन बड्या पदाधिकाऱ्यांसह चौघांना पोलिसांनी अटक केल्याने कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय आणि बांधकाम क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. सागाव येथील एका बेकायदा इमारतीमधील सदनिका विक्रीच्या व्यवहारात सामान्य नागरिकांची आणि शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप या नेत्यांवर आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी शिंदे सेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख रामचंद्र गणपत माने आणि महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांच्यासह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

असा उघडकीस आला ‘बनावट मंजुरी’चा आणि फसवणुकीचा डाव

या प्रकरणी बळीराम पांडुरंग जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१४ मध्ये सागाव-नांदिवली येथील ‘नंदा निवास’ चाळीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव रहिवाशांसमोर ठेवण्यात आला होता. त्यावेळी विकासकांनी ही इमारत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची अधिकृत परवानगी असलेली असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक रहिवाशाला ३५० चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नंतर त्यांना केवळ ३०० चौरस फुटांचे घर दिले जाईल आणि अधिक क्षेत्रफळासाठी वेगळे पैसे भरावे लागतील, असे सांगण्यात आले.

Dombivli doctor assault case: ‘एवढं मोठं प्रकरण झालं, रवींद्र चव्हाण होते कुठे?’ डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजू पाटलांचा सवाल

फिर्यादीने वाढीव २६५ चौरस फुटांच्या बांधकामासाठी बँकेतून कर्ज काढून १५ लाख रुपये संबंधित विकासकांना दिले. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ‘यशवंत पार्क’ इमारत अनधिकृत असल्याची कुणकुण फिर्यादीला लागली. त्यांनी बांधकाम परवानगीची अधिकृत पडताळणी केली असता, ऑगस्ट २००८ मधील दाखवण्यात आलेली जिल्हा परिषदेची परवानगी पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले.

शासनाचे खोटे शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर

तक्रारीत नमूद केल्यानुसार, केडीएमसी हद्दीतील या बांधकामासाठी जिल्हा परिषदेची बनावट परवानगी पत्रे, खोटे शिक्के आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा सर्रास वापर करण्यात आला. हा बनावट दस्तऐवज दाखवून ही बेकायदा इमारत अधिकृत असल्याचा भास निर्माण करण्यात आला, ज्यातून सर्वसामान्य घर खरेदीदारांची आणि शासनाची मोठी फसवणूक झाली.

पसार झालेले आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; राजकीय वर्तुळात चर्चा

अटक करण्यात आलेले आरोपी रामचंद्र माने यांनी काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता. त्यांच्यावर पक्षाने कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. तर दुसरे आरोपी लक्ष्मण मिसाळ हे बांधकाम कामगार क्षेत्रातील एका मोठ्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हे चौघेही आरोपी फरार झाले होते. मात्र, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शोध घेत अखेर या चौघांनाही अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.

‘ही तर शिंदे सेनेची गुंडशाही, केवळ FIR नव्हे, तर थेट…’, प्रियांका चतुर्वेदी यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल

Web Title: Shinde sena leaders ramchandra mane and laxman misal arrested in dombivli building fraud case marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • dombivali news
  • Eknath Shinde
  • Fraud Case
  • KDMC
  • shivsena

संबंधित बातम्या

Seva Sankalp Campaign :  शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन
1

Seva Sankalp Campaign : शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन

Kalyan Dombivli News : कल्याण-डोंबिवलीत युतीत बिघाडीचे संकेत? प्रभाग समिती सभापतीपदासाठी १८ उमेदवारांचे अर्ज
2

Kalyan Dombivli News : कल्याण-डोंबिवलीत युतीत बिघाडीचे संकेत? प्रभाग समिती सभापतीपदासाठी १८ उमेदवारांचे अर्ज

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
3

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
4

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.