पुणे : राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले. राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले.
त्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धोका देणाऱ्या आमदारांना परत पक्षात प्रवेश नाही. उद्धव ठाकरे यांना धोका का दिला असा जाब शिवसेना विचारत आहे.
दरम्यान आज पुण्यात बालगंधर्व येथे उद्धव ठाकरे यांना धोका देणाऱ्या आमदारांच्या निषेधार्थ शिवसेनेने आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे शहर प्रमुख
गजानन थरकुडे यांनी केले. या आंदोलनाच्या वेळी सविता मते, प्रशांत बधे
आनंद मंजाळकर,उमेश वाघ, प्रशांत राणे राजू पवार,अजय शिंदे,विलास सोनवणे, गोविंद निंबाळकर,हेमंत यादव,प्रवीण डोंगरे, संजय डोंगरे, तेजस मर्चंट अतुल दिघे, हरिश्चंद्र सपकाळ हेमंत धनवे, सीमा वरखडे, कलावती घाणेकर, करुणा घाडगे व सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[read_also content=”एकनाथ शिंदे मुंबईत कधी येणार?; दीपक केसरकर म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/when-will-eknath-shinde-come-to-mumbai-deepak-kesarkar-said-nrdm-297187.html”]
गजानन थरकुडे म्हणाले, आमच्या उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदे व जे आमदार त्यांच्याबरोबर आहेत त्यांना पक्षात योग्य स्थान दिले तरी त्यांनी शिवसेना विरुद्ध बंड पुकारले. त्यांनी शिवसेने शि गद्दारी केली. उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे व आमदारांनी धोका दिला आहे. हा शिवसेनेचा झालेला अपमान आहे. जेव्हा हे आमदार महाराष्ट्र येतील. तेव्हा आम्ही त्यांचा वेगळ्या पद्धतीने सत्कार करणार आहोत. राज्यातल्या
शिवसैनिकांची एकच भावना आहे. उद्धव ठाकरे यांना कोणी धोका देऊ नये. म्हणून आज आम्ही उद्धव ठाकरे यांना धोका देणाऱ्या आमदारांच्या निषेधात आंदोलन करत आहोत असे गजानन थरकुडे म्हणाले.